महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी..
वणी:-/ हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबीर येथील शिक्षण प्रसारक मंडळ शाळेत आयोजित करण्यात आले होते. दरम्यान याशिबिरात विविध आजार असलेल्या असंख्य रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.Numerous-patients-were-examined-at-the-Maha-Arogya-camp.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने वणी शहरातील एसपीएम हायस्कुल च्या प्रांगणात आयोजित केले होते. या शिबिरात हजारो रुग्णांनी सहभाग घेतला होता. यात विविध आजाराचे रुग्ण सहभागी झाले होते. जवळजवळपास अडीच ते तीन हजार रुग्णांनी सहभाग नोंदवला. यात विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्थानिक श्री संत जगन्नाथ महाराज नांदेश्वर देवस्थान येथे विविध दिवशी बोलाविण्यात आले आहे. आजतागायत सर्वात मोठे आरोग्य शिबीर विद्यमान आमदार संजय देरकर यांनी जनसामान्यांचा विचार करीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यात शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांचा प्रामुख्याने सहभाग होता. या शिबिरात विविध आजारावरील रुग्णांची तपासणी करून त्यांना विनोबा भावे रुग्णालय मेघे सावंगी येथे शस्त्रक्रिया होणार आहे. केवळ रुग्णांना औषध देण्यासाठी नव्हे तर?, त्यांच्या जिवासाठी आमदार संजय देरकर व संजय निखाडे यांनी जे कार्य केले ते जनसामान्याच्या आरोग्यासाठी! हे या महाशिबिरातून दिसले.
दोन ते तीन हजार रुग्णांनी केली तपासणी.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात अडीच ते तीन हजार रुग्णांनी सहभाग घेतला होता. सर्वांची तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना विविध तारखा देत विनोबा भावे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.
रुग्णांना जेवणाची व्यवस्था,अन आमदारांनी घेतला आस्वाद!
गावखेड्यातील जनता आरोग्य तपासणीसाठी एसपीएम शाळेच्या आवारात उपस्थित झाली होती. उपचारासाठी आलेल्या रुग्णांची काळजी घेत थेट विद्यमान आमदार संजय देरकर हे काळजी घेत होते.दरम्यान तपासणीसाठी आलेल्या रुग्णांसोबत आमदारांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
मोलाचे सहकार्य!
वणी येथील एसपीएम शाळेतील प्रांगणात महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. प्रसंगी या शिबिरात ग्रामीण रुग्णालय वणीचे अधीक्षक डॉ धर्मेंद्र सुलभेवार, डॉ विवेक गोफणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, व चमू व ग्रामीण रुग्णालयाची चमू. सोबतच सामाजिक कार्यकर्ते ,डॉ विलास बोबडे,संजय निखाडे, सर्वात महत्वाचे शिवसेनेचे दीपक कोकास,संतोष माहुरे,बालू दुधकोहळे, डुकरे व
सर्व रुग्ण व सामाजिक कार्यकर्त्यांची दखल, व काळजी घेणारा एकमेव डॉ विवेक गोफणे अनुभवयास मिळाला यानिमित्ताने!
विविध सुविधा..
नेत्ररोग तज्ञ
डोळ्यांचे सर्व आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी.
मेडिसिन तज्ञ
रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे इत्यादी.
सर्जरी तज्ञ
हायड्रोसील, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्यांचे आजार, मुतखड्याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायरॉईड) इत्यादी.
स्त्रीरोग तज्ञ
मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, गाठी, महिलांचे आजार इत्यादी.
बालरोग तज्ञ
हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकासासंबंधी आजार, कुपोषण, तसेच लहान मुलांचे सर्व आजार.
कान नाक घसा तज्ञ:
ऐकू न येणे, कानातून पाणी वाहने, टॉन्सिल, कान, नाक घश्याचे सर्व आजार इत्यादी.
अस्थिरोग तज्ञ
संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय फॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार,
त्वचारोग तज्ञ
खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार.

.jpg)