वणी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.
वणी:- वणी नगर परिषद क्षेत्रातील न.प. च्या जत्रा मैदानावर शनिवार ११-जानेवारी ला ५ वाजताचे सुमारास गाईचे दोन मुंडके आढळले होते. त्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी वणी पोलिसांनी तत्परता दाखवत सदर प्रकरणाची चौकशी केलीअसतां अंदाजे २५० ते ३०० गाईचे मुंडके त्या ठिकाणी आढळले. मात्र ज्या ठिकाणी गोहत्या व गोमांस विक्री सुरू होती ते कार्यक्षेत्र पालिकेच्या हद्दीत येत असताना वणी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने सदर प्रकरणात मुख्याधिकारी सचिन गाढे यांना सह आरोपी करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे तक्रारीतून केली आहे. Demand-to-file-cases-against-the-chief-officer-of-Wani-Municipality.
वणी नगर परिषद क्षेत्रातील न.प. च्या जत्रा मैदानावर दि. ११-०१-२०२५ ला संध्याकाळी ५ वाजताचे सुमारास गाईचे दोन मुंडके आढळले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वणी पोलिसांनी चौकशी केली असता अंदाजे दोनशे पन्नास ते तीनशे गाईचे मुंडके सापडले. परिणामी वणी शहरात तणाव सदृश स्थिती निर्माण झाली होती. सदर प्रकरणात कांही आरोपींना पोलीस स्टेशन कडून ताब्यांत घेतले होते. मात्र सदर हद्द नगर पालिकेच्या हद्दीत येत असताना वणी पालिकेचे मुख्याधिकारी सचिन गाढे आहेत तसेच त्यांच्याकडे प्रशासकाचा प्रभार सुध्दा त्यांचेकडे आहे. अंदाजे दोनशे पन्नास ते तीनशे गाईचे मुंडके आढळल्यामुळे हा गोमांस विक्रीचा व्यवसाय हा पालिकेच्या मुकसंमतीने सुरू असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सदर गोमांस व्यवसाय अंदाजे एक वर्षापासून सुरु आहे. त्याकडे मुख्याधिकारी यांनी सुद्धा दुर्लक्ष केले आहे. काही संघटना याबाबत पोलीस विभागाला सुध्दा जबाबदार धरत असल्याचा आरोप देखील रवींद्र कांबळे यांनी केला आहे. गोमांस व गोहत्या करण्याचा व्यवसाय पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने सुरू असल्याचे यावरून दिसून येत असल्याने वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन गाढे यांना सह आरोपी करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धर्मराव कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

.jpg)
%20(1).jpg)