हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू.
वणी:- शहरालगत असलेल्या चिखलगाव हद्दीतील, मेघदूत कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या ५० वर्षीय होतकरु तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजताचे सुमारास नागपुरात घडली आहे.The-young-man-died-of-a-heart-attack.
तालुक्यातील राजूर कॉलरी येथे पूर्वी वास्तव्यास असलेला सामाजिक व राजकीय प्रवाहात काही प्रमाणात असलेला मनमिळाऊ प्रमोद बापूराव नवघरे हा तरुण युवक राजूर कॉलरी येथील राजकीय व सामाजिक काम करणारा तरुण होता. आईवडील व आपल्या कुटुंबा समवेत प्रमोद गेल्या दशकापासून चिखलगाव हद्दीतील मेघदूत कॉलनी येथे वास्तव्यास होता. अत्यंत मनमिळाऊ असलेल्या प्रमोद ला व्यायामाचा जणू छंदच होता. वयाच्या तिसाव्या वर्षी त्याला प्रथम हृदयविकाराचा झटका आला होता. नागपुरात उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिरावली होती. त्यानंतर मिळेल ते काम करीत प्रमोद ने कुटुंबाचा गाडा चालविला. नुकतेच तो एका धरम काट्यावर कामाला रुजू झाला होता.
मंगळवारी दुपारी अडीच वाजताचे सुमारास प्रमोद च्या छातीत दुखू लागले. त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. प्रसंगी प्रमोद ला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यास सांगितले. नागपूर येथील हृदयरोग चिकित्सलयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी हृदयाची शस्त्रक्रिया केली खरी! मात्र काळाने घाला केला अन प्रमोद ने अखेरचा श्वास रात्री दहा वाजता घेतला. त्याच्या पश्चात एक मुलगा , पत्नी आणि कुटुंब आहे.
अंत्यविधीला हजारोच्या संख्येने जनसमुदाय!
प्रेमळ कार्यकर्ता असल्याने राजूर कॉलरी, चिखलगाव, वणी परिसरातील असंख्य जनसमुदाय वणी शहरातील मोक्षधमावर अंत्यविधीला उपस्थित होता. यात सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, आणि मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
आमदार संजय देरकरांची तरुण कार्यकर्त्याला श्रद्धांजली.
प्रमोद चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच. आमदार संजय देरकर हे प्रमोद च्या घरी पोहचले. कुटुंबाची भेट घेऊन अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर आमदारांनी कट्टर कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहिली.

.jpg)