-->

वणी पंचायत समितीच्या ३४ जिल्हा परिषद शाळेच्या कामात प्रचंड घोळ.

0

 वणी पंचायत समितीच्या ३४ जिल्हा परिषद शाळेच्या कामात प्रचंड घोळ?

लढा सामाजिक संघटनेची सीईओ कडे तक्रार.

वणी:-  पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ३४ जिल्हा परिषद शाळेतील "ई" वर्ग जमिन हर्रासाचे जमा रक्कमेच्या कामास प्रशासकीय मंजुरी आदेश दिलेल्या संपूर्ण कामाची चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यासंबंधीची तक्रार लढा या सामाजिक संघटनेने केली आहे. There-is-a-huge-mess-in-the-work-of-34-Zilla-Parishad-schools-of-Wani-Panchayat-Samiti.

वणी पंचायत समितीच्या ३४ जिल्हा परिषद शाळेच्या कामात प्रचंड घोळ.

    जिल्हा परिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३०/०९/२०२२ ला ई वर्ग जमिन हर्रासाचे जमा रकमेमधुन खर्चास मंजुरी प्रदान केली होती.  त्या अनुषंगाने वणी पंचायत समितीने सर्वसाधारण सभेत मान्यता प्रदान केल्यानंतर एकूण १,४०,४२,३४०/- (एक कोटी चाळीस लक्ष बेचाळीस हजार तीनशे चाळीस रुपये फक्त) रुपयाचे काम वणी तालुक्यातील ३४ जिल्हा परिषद शाळेत केले आहे. संपूर्ण शाळेत बोगस व निकृष्ठ दर्जाचे कामे करण्यात आले असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

विद्यमान आमदार श्री संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

     ३४ ही जिल्हा परिषद शाळेत काम करीत असतांना शाळा व्यवस्थापन समिती अथवा संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकाला कुठल्याही प्रकारचे मागणी पत्र न मागता व विचारात सुद्धा घेतले नाही व संबंधित कामाचा शाळा व्यवस्थापन समितीने ठराव सुद्धा दिला नाही. मात्र कागदोपत्री ठराव दिला असे दाखवून  तालुक्यातील ३४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अधिकाराचा गैरवापर करीत संगनमताने घोळ केला असल्याने गटविकास अधिकारी वणी यांनी संबंधीत कंत्राटदाराशी संगणमत करुन ३४ ही जिल्हा परिषद शाळेत बोगस कामे केली असल्याचा आरोप लढा या सामाजिक संघटनेने तक्रारीतून केला आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करुन संबंधीत अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर जिल्हा परिषदे ने कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे, विकेश पानघाटे आदींनी जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.


गटविकास अधिकाऱ्यांनी दाखविली केराची टोपली.

     वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लढा संघटनेच्या वतीने ०३ ऑक्टोबर २०२३ ला यासंबंधी तक्रार दिली होती.  मात्र सदर तक्रारीचा कोणताही पाठपुरावा न करता गटविकास अधिकारी यांनी सदर तक्रारीला केराची टोपली दाखविली असल्याचा आरोप लढा संघटनेने केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top