अज्ञाताने लावली तुरीच्या गंजीला आग. शेतकऱ्याचे नुकसान.
वणी:- शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिरपूर- वारगाव रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावली. यात शेतकऱ्याची तुरीची गंजी जाळून भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.An-unknown-person-set-fire-to-Turi's-barn.
शिरपूर येथील माजी सरपंच गजानन विश्वनाथ धगडी या शेतकऱ्याने शेतात कापूस तुरीची लागवड केली होती. तुरीचे पीक काढणीला आल्याने गजानन यांनी शेतात तुरीची कापणी करून गंजी लावली होती. शनिवारी गजानन धगडी हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ऐन दुपारी दीड वाजताचे सुमारास अज्ञात इसमाने तुरीच्या गंजीला आग लावली. या घटनेचा सुगावा लागताच गजानन ची पत्नी धावतच शेतात गेली. मात्र आग विझविण्यासाठी ती कमी पडली. लागलीच पत्नीने गजानन ला फोन केला. लगबगीने गजानन शेतात पोहोचला. तोपर्यंत तुरीची गंजी भस्मसात झाली होती. या आगीत शेतकरी गजानन धगडी यांचे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची तक्रार गजानन धगडी यांनी शिरपूर पोलिसात दिली त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करीत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलीस करीत आहेत.