-->

वणीत न.प.शाळा क्र. सात मध्ये होणार बालकांची आरोग्य तपासणी

0

 वणीत न.प.शाळा क्र. सात मध्ये होणार बालकांची आरोग्य तपासणी

वणी:- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम "विशेष तपासणी मोहीमेच्या अंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी शहरातील न.प. शाळा क्र. सात मध्ये १ मार्च शनिवार ला होणार आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Health-check-up-of-children-will-be-held-in-wani-N.P.-School-No.-7

वणीत न.प.शाळा क्र. सात मध्ये होणार बालकांची आरोग्य तपासणी

     परिसरातील ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत संपूर्ण राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता "राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम" विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. 

    ही आरोग्य तपासणी १ मार्च शनिवारी वणी शहरातील नगर परिषद शाळा क्र. ७ मध्ये करण्यात येणार आहे. बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम चमूतील डॉ वैशाली भट, डॉ मंजुषा दुगाने, डॉ किशोर भांडेकर, डॉ विराज भिलावेकर राहणार आहेत.

सोबतच गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्याधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top