वणी उपविभागातील विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन.
शेतकरी, शेतमजूर, वणीकरांच्या समस्येसाठी सरसावले संजय खाडे
वणी: शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वीज ग्राहक, महिला अत्याचार आणि वणी व परिसरातील विविध समस्यांसाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वणी येथील तहसील कार्यालयासमोर होणार आहे. वणी, मारेगाव आणि झरी तालुका काँग्रेस तर्फे हे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे हे या आंदोलनाचे समन्वयक असून यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. वणी उपविभागातील सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संजय खाडे यांनी केले आहे. Congress-holds-sit-in-protest-for-various-demands-in-Wani-subdivision.
वीज बिल माफ करावे, विजेची सातत्याने उपलब्धता करून द्यावी, शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, पिकांना हमी भाव द्यावा, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर शासन करावे, वणी परिसरातील मुलभूत सुविधा व नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात, बेरोजगारांचे प्रश्न सोडवावेत या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश आहे.
नागरिकांच्या समस्या "जैसे थे" – संजय खाडे
वणी उपविभागात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे घरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीसाठी वीजपुरवठ्याचा प्रश्न अजूनही जैसे थे आहेच. वीज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांमुळे वणीकर त्रस्त आहेत. शहरात 8-8 दिवस पाणीपुरवठा होत नाही. घाणीची व आरोग्याची समस्या कायम आहे. या समस्यांवर वारंवार निवेदने देऊनही प्रशासन त्यांचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. म्हणूनच हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.