अवघ्या तीन वर्षीय वैभवीने केला स्केटिंग मध्ये विक्रम

0

 अवघ्या तीन वर्षीय वैभवीने केला स्केटिंग मध्ये विक्रम

वणी:-  शहरातील नर्सरी मध्ये बालपणीचे धडे गिरविण्याऱ्या अवघ्या तीन वर्षीय वैभवीने कौशल्य दाखवीत स्केटिंग मध्ये विक्रम नोंदविला आहे. Just-three-year-old-Vaibhavi-sets-a-record-in-skating

अवघ्या तीन वर्षीय वैभवीने केला स्केटिंग मध्ये विक्रम


वणी शहरातील केवळ तीन वर्षांची वैभवी योगेश मसराम हिने आपल्या अल्पवयातच स्केटिंगमध्ये असामान्य कौशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. My Chhota School वणी येथील नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेली वैभवी हिने आतापर्यंत २ विक्रम आपल्या नावावर केले आहेत, तसेच अनेक स्केटिंग स्पर्धांमध्ये भाग घेत अनेक वेळा सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. विशेष म्हणजे, नागपूर येथे झालेल्या ४ वर्षांखालील गटातील स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळवले आहे.

  वणीमध्ये स्केटिंगसाठी आवश्यक सुविधा नसल्यामुळे, वैभवीने दर शनिवार आणि रविवारला वणीहून चंद्रपूर येथे जाऊन सातत्याने स्केटिंग सराव केला. इतक्या लहान वयातही नियमितपणे प्रवास करून ती आपली कला प्रगल्भ करत राहिली आहे. तिच्या यशामागे तिचे प्रशिक्षक  अतिश धुर्वे यांचे कुशल मार्गदर्शन आणि तिच्या पालकांचे प्रचंड समर्पण आहे.

  वैभवीच्या या कामगिरीची दखल घेत India Book of Records तसेच Influencer Book of World Records मध्ये तिची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय ती आणखी काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रमांसाठी तयारी करत आहे.

  तीव्र इच्छाशक्ती, परिश्रम आणि कौशल्य यांच्या जोरावर ही लहानग्या स्केटर क्वीन आपल्या वयाच्या कितीतरी पटीने पुढे आहे. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. भविष्यात ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी शहरातील वैभवी एकमेव असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top