साधनकरवाडी परिसरात घरफोडी, १५ लाखाचा मुद्देमाल लंपास.
वणी :- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिखलगाव परिसरातील कुटुंब बाहेरगावी गेल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील अंदाचे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेची तक्रार होताच वणी पोलीस,डीबी पथक,एलसीबी पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते.Burglary-in-Sadhankarwadi-area,-valuables-worth-15-lakhs-stolen.
चिखलगाव ग्रामपंचायत च्या हद्दीत येणाऱ्या साधनकरवाडी येथील प्रदीप चिंडालिया हे कुटुंबासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरच्या दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. व घरातील कपाटात असलेले सोन्याचांदीचे दागिने व दोन लाखाहून अधिक रक्कम असा जवळपास १५ लाखाचा मुद्देमाल लंपास करून पसार झाले.
३ फेब्रुवारी ला घरकाम महिला आली तेव्हा तिला स्वयंपाक खोलीचे दार उघडून घरफोडी झाल्याचे दिसून आले. घरकाम करणाऱ्या महिलेने तात्काळ या घटनेची माहिती चिंडालिया यांना फोनवरून दिली. त्यावरून अक्षय प्रदीप चिंडालिया यांनी सदर घटनेची तक्रार पोलिसांत दिली असता नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी वरिष्ठांना माहिती देत तपासाला सुरुवात केली. तपासकामी एलसीबी पथक,डीबी पथक, श्वान पथक दाखल झाले होते. तीन दिवसांपूर्वी रुजू झालेल्या नवीन ठाणेदारांना चोरट्यानी घरफोडी करीत जणू आव्हानच दिले आहे.