-->

वणीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा वाढदिवस उत्साहात.

0

 वणीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा वाढदिवस उत्साहात.


सामाजिक उपक्रमाचे आयोजन लोकसेवेचे माध्यम. – संजय खाडे


वणी:- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस वणीत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय वणी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व पुरोगामी विचाराने प्रेरित आहे. परिणामी आम्हाला केवळ राजकारणासाठी नव्हे, तर जनसेवेसाठी झटण्याची प्रेरणा देते. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आमच्यासाठी नव्या प्रेरणेचा सोहळा आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी केले आहे. Congress-state-president-Sapkal's-birthday-celebrated-in-Wani-with-enthusiasm.

वणीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा वाढदिवस उत्साहात.

 

आदरणीय राहुलजींचे विचार जनतेसमोर पोहचविणार!

संजय खाडे...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात काँग्रेस चे प्रदेश सचिव  संजय खाडे बोलतांना पुढे म्हणाले की हर्षवर्धन सपकाळ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत आहे. त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष वणी विधानसभा क्षेत्रात वाटचाल करीत आहे. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राजकारण हे केवळ निवडणुकी पुरते मर्यादित नसून ते लोकसेवेचे माध्यम आहे.  हा त्यांचा विचार आम्हाला सतत प्रेरणा देतो. परिणामी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सदैव जनतेच्या कल्याणासाठी झटतात. परिणामी आम्हीही त्याच वाटचालीची प्रेरणा घेत पुढे जाऊ!


रुग्णांशी संवाद!

ग्रामीण रुग्णालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. कार्यक्रमाला डॉ.प्रा. शंकर वऱ्हाटे, प्रमोद लोणारे, ओम ठाकूर, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहोकार, राजू अंकितवार, अशोक चिकटे, ज्ञानेश्वर बोनगीरवार, ईश्वर खाडे, धनंजय खाडे, प्रशांत गोहकर, उत्तम गेडाम, तेजराज बोढे, विकेश पानघाटे, जितू बोंडे, प्रफुल्ल उपरे, संदीप ढेंगळे, हर्षल नरपांडे, 
महादेव दोडके आदी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top