-->

या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

0

 या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे कृषी विभागाचे आवाहन

वणी:-  दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचा मुक्काम आणखीच वाढला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.  पावसाने आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके खरडून गेली आहे. परिणामी शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.  यातच परतीचा पाऊस सुरू झाला आहे. २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  या कालावधीत शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. Chance of heavy rain with gusty winds during this period

या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

     बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान ३० सप्टेंबर पर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपार नंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top