शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना(उ.बा.ठा.)ची तहसील कार्यालयावर धडक
वणी:- यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, शेतकरी हवालदिल झाले आहे. तरीही महायुती सरकार मात्र झोपेचे सोंग घेत बसले आहे. शेतकरी विरोधी सरकारला जागे करण्यासाठी शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी डफडे मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडक देत झोपलेल्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.Shiv Sena U.B.T.attacks Tehsil office for farmers' rights to justice
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. जिकडेतिकडे महापुराचा प्रलय बघायला मिळते आहे. या सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे काढणीला आलेली पिके उध्वस्त झाली आहे. तर पुरामुळे अनेकांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यात वणी,मारेगाव,झरी तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहे. मात्र सरकार पंचनामे, निकष यावरच अडकले आहे.
आधीच सुरू केलेली एक रुपयात पीकविमा योजना बंद केली. मागील काळातील पिकविम्याची रक्कम सरकारने शेतकऱ्यांना दिली नाही. व कापूस ,सोयाबीन पिकावरील आयात शुल्क हटविल्याने शेत मालाला भाव नाही. अशा विवंचनेत शेतकरी पुरता अडकला असतांना हे शेतकरी विरोधी सरकार मात्र अद्यापही चिरनिद्रेत आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी वणी तहसिल कार्यालयावर धडक देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने डफडे आंदोलन करण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे. तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. या प्रमुख मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या या महायुती सरकारला हे लक्षात ठेवावे लागेल की, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कटिबद्ध आहे.
या आंदोलनात जिल्हा प्रमुख संजय निखाडे योगिता मोहोड , किरण देरकर , उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, सुधीर थेरे,संतोष कुचनकर, राजेंद्र इद्दे,पोर्णिमा राजुरकर, गीता उपरे, संजय देठे ,विलास बोबडे , मनीष बत्रा, विनोद ढुमणे , राजु तुरणकर,अजिंक्य शेंडे ,विवेक ठाकरे ,विलास कालेकर ,संतोष धांडे ,राजू तुरणकर, दिवाकर कवरासे, सतीश बडघरे, प्रगती घोटेकर , सीमा बालगोणी, वैशाली देठे, अल्का कूचनकार , सुमित्रा पाचभाई, संगीता देरकर व मोठ्या संख्येने शेतकरी, शिवसैनिक, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी सहभागी झाले होते