ओला दुष्काळ जाहीर करा झरी तालुका काँग्रेसची मागणी
वणी:- सध्या जिकडेतिकडे अस्मानी संकटाने शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतातील उभी पिके खरडून गेली आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन झरी तालुका काँग्रेसने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. Congress demands to declare a wet drought in Zari taluka
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बहाल झाले आहे. पुरामुळे जमिनी खरडून गेल्या आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच पळविला आहे. परिणामी शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टाच चालविली आहे. यासाठी झरी तालुका काँग्रेस कमिटीने खालील मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
मागण्या:
१. पुरग्रस्त शेतकरी बांधवांना त्वरीत हेक्टरी ७५००० रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.
२. झरी जामणी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा.
३. झरी जामणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करावा.
४. रब्बी पिका करिता सरसकट सर्व शेतकऱ्यांना २ क्विंटल चना बियाणे १००% अनुदान द्यावे.
५. मागील काही महिन्यापासून निराधार लोकांचे वेतन थकीत आहे त्यांच्या खात्यात त्वरित वेतन जमा करावे. आदी मागण्यांचा उल्लेख निवेदनातून करण्यात आला आहे. सदर निवेदन तहसीलदार झरी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
निवेदन देतांना झरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप बुर्रेवार, माजी जी.प.सदस्य प्रकाश कासावार,
भूमारेड्डी बाजनलावार, भगवान चुक्कलवार, नंदू किनाके, गंगाधर आत्राम, सुरेंद्र गेडाम, केशवराव लक्षट्टीवार, दिवाकर पुसाम, नितीन खडसे, राजू आस्वले सह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.