-->

डिसेंबर मध्ये उडणार निवडणुकीचा धुरळा

0

 डिसेंबर मध्ये उडणार निवडणुकीचा धुरळा

३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समितीच्या निवडणुका

वणी:-  राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाल्याची माहिती आहे.  त्यानुसार अंतिम व मतदार केंद्रनिहाय यादी येत्या २७ ऑक्टोबर ला जाहीर होण्याची शक्यता आहे.  परिणामी जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा डिसेंबर महिन्यात उडणार असल्याचे दिसते आहे.The election dust will rise in December.

डिसेंबर मध्ये उडणार निवडणुकीचा धुरळा

     राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका विविध कारणाने रखडल्या होत्या. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा सातत्याने हिरमोड झाल्याचे बघायला मिळाले.  पण आता प्रतीक्षा संपली आहे.  
    राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे.  या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकीत वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे.  निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदीं संदर्भातील दुरुस्त्या हरकीत आणि सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात.
    त्या अनुषंगाने डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top