शिव मंदिरामागे आढळला इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
ब्राह्मणी फाट्याजवळील घटना
वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ब्राम्हणी फाट्याजवळील शिव मंदिराच्या मागे कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. सदर इसमाचा गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. Decomposed body of men was found behind Shiva temple
मृतकाच्या गळ्यावर आवळ्याचे व्रण असल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू देठे करीत आहे. सध्यातरी मृतकाची ओळख पटली नाही. बेपत्ता व्यक्ती तपासून या घटनेचा गूढ उलगडा होण्याची शक्यता आहे. आता ही घटना घातपाती की आत्महत्या हे गूढ कायम आहे.

