आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाचा धनादेश प्रदान
आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत प्रदान
संगिनी न्यूज :- मारेगाव महसुल विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या चोपण येथील आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत एक लाख रुपयाचा धनादेश वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय देरकर यांचे प्रमुख उपस्थीती प्रदान करण्यात आला आहे. प्रसंगी मारेगाव तहसिलदार उत्तम निलावाड,मार्डीचे मंडळ अधिकारी आर.एस.वरठे,प्रामुख्याने उपस्थीत होते. One lakh rupees cheque presented to suicide victim's family
उपविभागात शेतकऱ्यांच्या सातत्याने आत्महत्या सुरुच आहे. मागील मे महिण्यात मारेगाव तालुक्यातील चोपण येथील प्रभाकर निखाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. महसुल विभागाने या शेतकरी कुटुंबाच्या एकुण परिस्थीतीचा अभ्यास करुन त्याच्या वारसांना शेतकरी आत्महत्या सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत एक लाख रुपयाचे अनुदान मंजुर करण्यात आले होते. त्या अनुदानातील एक लाखाचा धनादेश २९ सप्टेंबर सोमवारला वणी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार संजय देरकर,तहसिलदार उत्तम निलावाड, मंडळ अधिकारी आर.एस.वरठे,यांच्या प्रमुख उपस्थीतीत आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाचे चोपण येथील राहते घरी जाऊन वारस प्रमुख प्रविण निखाडे चोपण यांना प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे, अजय कवरासे,मारेगाव तालुका प्रमुख पुरूषोत्तम बुटे, विनोद ढुमणे,डॉ.जगन जुनगरी,सुधिर थेरे,सरपंच संजय गोहोकर,कृषी उत्पन्नबाजार समीती संचालक,वसंतराव आसुटकर, गणुजी थेरे, दिवाकर सातपुते, सचिन पचारे,विजय अवताडे,शरद ताजणे,चंद्रशेखर थेरे,अविनाश भाजपाले,यांचे सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.