-->

शिवसेना ठाकरे पक्षात इनकमिंग ला सुरुवात

0

 शिवसेना ठाकरे पक्षात इनकमिंग ला सुरुवात

लाठी लालगुडा सर्कल  मधील  विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

वणी:-  विधानसभेचे विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत विविध पक्षातील कार्यकर्त्यांचे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात इन कमिंग सुरू झाले आहेत. लाठी-लालगुडा गटातील भाजप-प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. Shiv Sena Thackeray's incoming party begins

शिवसेना ठाकरे पक्षात इनकमिंग ला सुरुवात

     लाठी लालगुडा जिल्हा परिषद गटात निवडणुकीचा ज्वर भरला असल्याचे दिसायला लागले आहे.  विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाला तरुणांची चांगलीच पसंती असल्याने विविध पक्षातील कार्यकर्ते आकर्षित होत आहे. परिणामी शिवसेनेची मशाल तेजाने प्रज्वलित होतांना दिसते आहे. 
     आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपा व प्रहार पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
      आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षात इनकमिंग वाढल्याने इतर पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.  इतर पक्षातील तरुणांना पक्षप्रवेश करण्यासाठी संजय देठे, व प्रफुल बदखल यांचे योगदान लाभले आहे.

यांनी घेतला शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षात प्रवेश


भालर : गोविंदा आत्राम, शंकर जेऊरकर, शंकर पेंदाने, ग्रामपंचायत सदस्य किशोर लखमापूरे, प्रमोद देठे
बोरगाव (अहेरी) : सुमित कळसकर, तन्मय बल्की
लालगुडा : आबा बांगडे, कौसर अली सय्यद, विलास उमाटे, राजु कामटकर, सादिक पठाण, चंदू बोरपे, संजू घरकुडे 


“शिवसेना ही सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांची मशाल आहे. आपल्या कार्यकर्त्यांमुळे आणि युवकांच्या विश्वासामुळे शिवसेना अधिक बळकट होत आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा माझा परिवार असून, सर्वांना न्याय आणि विकास हा माझा ध्यास आहे. पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.” आमदार संजय देरकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top