शिवसेना ठाकरे पक्षाचा आरसीसीपीएल कंपनी विरुद्ध उद्रेक
शिवसेना (उबाठा) पक्षाचा आरसीसीपीएल एमपी बिर्ला कंपनीविरोधात उद्रेक – आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन यशस्वी
वणी (जि. यवतमाळ) : मुकुटबन येथील आरसीसीपीएल एमपी बिर्ला सिमेंट कंपनी विरोधात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. त्यानंतर उपोषण स्थळी आमदार संजय देरकर येताच आंदोलनाला निर्णायक वळण लागले. आमदार देरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्त्यांनी कंपनीचे गेट उघडून आत प्रवेश केला. प्रसंगी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व शिष्टमंडळाने मध्यस्थी करीत आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या. Shiv Sena Thackeray's party's outburst against RCCPL company
मुकुटबन येथील आरसीसीपीएल एमपी बिर्ला सिमेंट कंपनीविरोधात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणानंतर आंदोलनाला आज निर्णायक वळण मिळाले. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी कंपनीचे गेट उघडून आत प्रवेश केला. काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेताजी पारखी, संदीप विंचू व संकेत गज्जलवार यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. परंतु कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आज आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी थेट कंपनीत शिरकाव केला. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असतानाही हे कसे घडले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
घटनेची दखल घेत पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आमदार संजय देरकर यांच्याशी संपर्क साधून “मी स्वतः लक्ष घालून मार्ग काढतो” अशी ग्वाही दिली. आंदोलनाची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आमदारांची शिष्टमंडळासोबत चर्चा
आमदार देरकर व शिष्टमंडळ यांच्यात तब्बल ५ तास चर्चा झाली आणि अखेर तोडगा निघाला.
त्यात पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले :
कंपनीच्या कामगारांचा पगार (Minimum Wages Act) नुसार दिला जाईल.
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात पहिले प्राधान्य देण्यात येईल.
सिमेंट रॅक थांबत असल्याने दररोज ४ वेळा रस्ता बंद होतो; त्यावर १० दिवसांत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल.
येडशी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवले जातील.
रस्त्यावरची पार्किंग व्यवस्था बंद करण्यात येईल.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, संतोष माहूरे, विनोद उप्परवार, तालुका प्रमुख सतीश आदेवार, संतोष कुंचनकर, मंगेश पाचभाई, अशोक पंधरे, दुष्यंत उपरे, अनिल देगरवार, दयाकर गेडाम, सीताराम पिंगे, दिवाकर कोल्हेकर, संतोष धांडे, गौरव पंधरे, तसेच मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते.

.webp)