-->

जन्मदात्या आईवर अत्याचार करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा

0

 जन्मदात्या आईवर अत्याचार करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा

पांढरकवडा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

वणी:-  तालुक्यातील एका गावातील महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलास पांढरकवडा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. Son sentenced to life imprisonment for torturing his biological mother

जन्मदात्या आईवर अत्याचार करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा

     तालुक्यातील एका गावातील महिला आपल्या लेकीला १९ जुलै २०२१ ला वणी येथे भेटायला आली होती. मुलीला भेटून परत आल्यावर २३ जुलै ला आरोपी मुलाने आईला मारहाण केली.  त्याच दिवशी रात्री ९ वाजता आरोपी दारूच्या नशेत घरी आला.  तेव्हा आईने त्याच्या खोलीत जाऊन जेवणाचे ताट दिले.  
     जेवण झाल्यानंतर आरोपीने पुन्हा तिला पट्टयाने बेदम मारहाण केली.  आणि पहाटे नराधम मुलाने आईवर अत्याचार केला.  या घटनेने पीडित महिला हादरून गेली होती.  परिणामी तिने टोकाचे पाऊल टाकत विष प्राशन केले.  त्यानंतर पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला वणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  तब्बल सहा दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. 
शुद्धीवर येताच पोलिसात तक्रार दाखल
     पीडित महिला वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती.  सहा दिवसानंतर तिला शुद्ध आली. आणि ३० जुलै ला तिने वणी पोलीस ठाणे गाठत स्वतःच्या मुला विरुद्ध तक्रार दाखल केली.  तक्रारीवरून पोलिसांनी भा दं वि ३७६(२)(एफ), ३७६(२),(एन) ३२३,५०६ अन्वये गुन्हे दाखल केले होते.
    या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरुण नाकतोडे यांनी करीत आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानिशी पांढरकवडा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.  सरकारी वकील ऍड रमेश मोरे यांनी सदर प्रकरणात आठ साक्षीदार तपासले.  पांढरकवडा येथील विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार संतोष मडावी यांनी काम पाहिले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top