-->

भाजपच्या पदाधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ भोवली

0

 भाजपच्या पदाधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ भोवली

गावातील मोलमजुरी करणाऱ्या दलित दाम्पत्याला केली होती शिवीगाळ

शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल

वणी:-  शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निलजई येथील दलित दाम्पत्याला सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BJP office bearer hurled casteist abuse

भाजपच्या पदाधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ भोवली

     तालुक्यातील निलजई येथील मोलमजुरी करणारी साधना प्रशांत नगराळे ३७, ही महिला आपल्या पतीसह मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते.  ३० ऑगस्ट रोजी गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसभा आटोपून वणी तालुका भाजपच्या सरचिटणीस पदावर असलेला मंजू उर्फ मनोज भाऊराव डंभारे ४८, हा नगराळे यांच्या घरासमोर येऊन जातीवाचक शिवीगाळ करीत गावातून हाकलून देण्याची धमकी देत होता.      त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी नगराळे दाम्पत्य काम मिळविण्यासाठी गावालगत असलेल्या जीआरएन कंपनीत गेले असता तेथे ही मंजू डंभारे याने सत्तेतील पक्षाच्या पदाचा तोरा दाखवत कंपनीतील अधिकाऱ्यांना दमदाटी करीत 'हे लोक येथे दिसले नाही पाहिजे. जर काम दिले तर कंपनी बंद पाडण्याची धमकी दिली.'        मंजू डंभारे याने केलेल्या दमदाटी मुळे नगराळे दाम्पत्य घाबरले. हाताला काम मिळणार नाही तर उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. सततच्या धमक्या जातीवाचक शिवीगाळ या प्रकाराने घाबरलेल्या साधना प्रशांत नगराळे हिने पतीसह शिरपूर पोलीस ठाणे गाठून मंजू उर्फ मनोज भाऊराव डंभारे विरोधात जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दाखल केली.

     भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

कोळसा खाण परिसरात विविध कंपन्या कार्यरत आहे.  माजी आमदाराच्या नावावर कंपनीतील अधिकाऱ्यांना दमदाटी करीत स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या भाजपचा तालुका सरचिटणीस मंजू डंभारे विरुद्ध अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. साधना नगराळे या महिलेच्या तक्रारीवरून पोलीस तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top