-->

उभ्या ट्रकवर दुचाकी धडकल्याने दोघांचा मृत्यू

0

 उभ्या ट्रकवर दुचाकी धडकल्याने दोघांचा मृत्यू

नवरगाव-उमरी जवळ भीषण अपघात.

वणी:-  पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुकुटंबन मार्गावरील नवरगाव-उमरी जवळ नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजताचे सुमारास घडली आहे. Two killed after bike hits stationary truck

उभ्या ट्रकवर दुचाकी धडकल्याने दोघांचा मृत्यू

    

शहरातील सचिन प्रकाश येल्लारवार  २५, गायकवाड लेआऊट नांदेपेरा मार्ग वणी. व संदीप विजय चामुलवार ३८ रंगारीपुरा वणी.  हे दोघे काम आटोपून मुकुटंबन वरून वणीकडे येत असताना उमरी- नवरगाव जवळील मार्गावर गेल्या तीन दिवसांपासून नादुरुस्त असलेला ट्रक क्रमांक एम एच 34 बिजी 8962 दुचाकीस्वाराला दिसला नसल्याने ट्रकवर दुचाकी धडकली.  या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  घटनास्थळ पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top