-->

चिखलगावचा अतिक्रमण वाद खासदारांच्या दरबारात

0

 चिखलगावचा अतिक्रमण वाद खासदारांच्या दरबारात!


गावपुढाऱ्यांच्या हुकूमशाही विरुद्ध युवकांचा एल्गार


वणी:-/  शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करून देण्याची मागणी करणारे निवेदने स्थानिक ग्रामपंचायत, सरपंच, आणि प्रशासनाला देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने  अखेर युवकांनी आमदार,खासदार यांच्या दरबारात गावातील अतिक्रमण काढून देण्याच्या मागणीचे निवेदन सादर करीत गावातील हुकूमशाही विरुद्ध एल्गार पुकारला आहे.  Chikhalgaon encroachment dispute in the court of MPs  

चिखलगावातील अतिक्रमण वाद आमदार खासदारांच्या दरबारात
चिखलगावचा अतिक्रमण वाद, आमदार, खासदारांच्या दरबारात!

     
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून चिखलगाव ची ओळख आहे.  गावातील अनेक भागात विविध भागातील नागरिक येथे वास्तव्यास आहे.  परिणामी व्यावसायिक हेतूने अनेकांनी वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत.  शासकीय जागा सुद्धा गिळंकृत करण्याचा जणू कुटील डाव काही राजकीय पुढाऱ्यांच्या मर्जीतील लोक आखत असल्याचे आरोप गावातील युवकांनी केले आहेत.


प्रशासनाने निवेदनाला दाखवली केराची टोपली


    गावातील युवकांनी मुख्य रस्ते शासकीय जागा व अन्य काही ठिकाणी अनेकांनी केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करीत सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, एसडीओ आदींना गावातील अतिक्रमणे काढून देण्यासंदर्भात निवेदने सादर केली आहेत.  मात्र गावपुढाऱ्यांनी राजकीय बळ वापरल्याने सदर अतिक्रमण हटविण्याच्या मागणी निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.


चिखलगावातील अतिक्रमण वाद आमदार खासदारांच्या दरबारात


     प्रशासनाला वारंवार निवेदन तक्रारी सादर करून प्रशासनाने यासंबंधीच्या निवेदनाला केराची टोपली दाखवत कोणत्याही हालचाली न केल्याने, गावातील रोहन वरारकर, रोशन ढुमणे, द्रविड रांगणकार, स्वप्नील पिंपळशेंडे, लखन ठावरी, अक्षय दडांजे, प्रतिक मोहूर्ले, प्रतीक रांगणकार,  साहिल कुळमेथे, यश मोहूर्ले, प्रेम डवरे, मंगेश वैद्य आदी युवकांनी याआधी विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन सादर केले होते.  त्यानंतर विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन सादर करीत चर्चा केली.  यात आमदार खासदारांनी संबंधितांना यासंदर्भात आदेशीत करणार असल्याचे सांगितले.  आता चिखलगावातील अतिक्रमण संदर्भात खरच आमदार, खासदार लक्ष देणार की गावपुढाऱ्यांच्या बाजूने उभे राहणार ही येणारी वेळच ठरविणार आहे. Chikhalgaon encroachment dispute in the court of MPs


चिखलगावातील युवकांचा एल्गार


     गावातील वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चिघळण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.  जर प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही तर युवक आंदोलन उभारणार असल्याची माहिती आहे.  संबंधित जबाबदारी संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन आणि वरिष्ठ यंत्रणेची असेल असेही युवकांनी बोलून दाखविले आहे.  परिणामी चिखलगावातील वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  आता लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यात लक्ष घालणार की, राजकीय पुढाऱ्यांना पाठबळ देणार?  हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top