-->

३८ वर्षांनी झाली जुन्या सवंगड्यांची गाठभेट!

0

 ३८ वर्षांनी झाली जुन्या सवंगड्यांची गाठभेट!


१९८७ दहावीच्या तुकडीच्या स्नेहमीलनाने आठवणींना उजाळा


जल्लोषात पार पडला स्नेहमीलन कार्यक्रम


वणी:- /  लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.  या ओळी आठवल्या, गेल्या ३८ वर्षांनी भेटलेल्या त्या सवंगड्यांची गाठभेट, स्नेहमीलन सोहळ्याच्या निमित्ताने नायगाव लगत असलेल्या महालक्ष्मी हॉल मध्ये २६ ऑक्टोबर ला १९८७ च्या तुकडीच्या स्नेहमीलन कार्यक्रमाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. Old friends reunited after 38 years!

३८ वर्षांनी झाली जुन्या सवंगड्यांची गाठभेट!
३८ वर्षांनी झाली जुन्या सवंगड्यांची गाठभेट!


     विवेकानंद विद्यालय वणी येथे काही विद्यार्थी एक ते पाच अन काही पाच ते दहा त्यातही आठवीपासून तुकड्यात समाविष्ट झालेले जुने विद्यार्थी, काय ते दिवस अन काय त्या आठवणी!

असाच कार्यक्रम विवेकानंद विद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. यात विविध राज्यातील, विविध पदावरील त्याकाळी असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला हे विशेष!


मान्यवर शिक्षकांना मानवंदना


महालक्ष्मी हॉल मध्ये आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवंगत दे. मा. ठावरी सर्वेसर्वा विवेकानंद विद्यालय वणी चे मुख्याध्यापक होते.  त्यांनतर अरुण गंगशेट्टीवार गुरुजी उपमुख्याध्यापक, नंतर मुख्याध्यापक झालेत.  १९८७ च्या तुकडीचे दोन मुख्याध्यापक स्नेहमीलन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.  तर विशेष प्रमुख उपस्थिती म्हणून स्व. दे.मा. ठावरी सरांच्या अर्धांगिनी श्रीमती   ठावरी मॅडम या होत्या.  मंचकावर मिलमिले सर, बोढे सर, टोंगे सर,चिखले सर, आणि शाळेतील त्यावेळी असलेले शिपाई निंदेकर भाऊ उपस्थित होते.


१९८७ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा परिचय


    त्यावेळी विवेकानंद विद्यालयात शिकणारे विविध पदावर कार्यरत असलेले विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.  सर्वांनी आपला त्यावेळीचा अनुभव व परिचय सांगितला.  परिणामी अनेकांना जुन्या आठवणींचा उजाळा मिळाला. 


कार्यक्रमाचे नियोजन अव्वल!


   १९८७ दहावीत शिकणारे विद्यार्थी एकत्र येत आहे याचा आनंद काही बंधू,सवंगडी प्रेमींना इतका झाला की, त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.  ती एक पर्वणीच होती.  सुरुवात मान्यवर गुरुजनांचे स्वागत, त्यानंतर नाश्ता, आणि सांगतेला जेवण भेटीगाठी इतक्या सुंदर स्नेहमीलन सोहळ्याचे नियोजन अव्वल होते.


अनेक जण कार्यक्रमाला मुकले.
     
नियोजित स्नेहमीलन कार्यक्रम छान झाला.  बहुतांश लोकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.  मात्र काही जणांच्या घरी लग्न, इतर नियोजित अन वेळेवर आलेल्या कामांमुळे अनेकांना या स्नेहमीलन सोहळ्याचा आनंद घेता आला नाही.  परिणामी आवक जण कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

३८ वर्षांनी भेटलेल्या सवंगड्यांचा जल्लोष!
विवेकानंद विद्यालय वणी येथील १९८७ मध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.  उपस्थितांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.  अगदी भेटीगाठी, जुन्या आठवणी जाग्या करीत हा सोहळा जल्लोषात पार पडला.
रवी ढुमणे ✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top