ठाकरेंच्या शिवसेनेने अडवला मंत्री अशोक उईकेचा ताफा
शेतकऱ्यांसाठी सरसावली ठाकरे सेना.
वणी:- राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला असतांना शासनाने वेळकाढू धोरण राबविले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी मदत जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी रेटत सोमवारी आढावा बैठकीला आलेल्या आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांचा ताफा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दहा मिनिटे अडवला होता. अखेर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले.Thackeray's Shiv Sena stopped Minister Ashok Uike's convoy
शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडविल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला पण उद्रेक वाढला होता. अखेर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले होते.
सरकारला आढावा बैठका घेण्यासाठी वेळ आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. शेतकरी पुरता संकटात असतांना मंत्र्यांना आढावा बैठकी घ्यायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वेळ नाही. सरकारने तात्काळ ओला दुष्काळ व कर्जमाफी जाहीर न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसंगी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर सुद्धा सहभागी झाले होते. शेकडो शिवसैनिक आमदार देरकर यांच्यासोबत बैठक स्थळाकडे रवाना झाले होते.

