बेलोरा रस्त्यालगत आढळला संशयास्पद मृतदेह
मृतदेहा शेजारी दगड, दारूच्या बाटल्या व ग्लास
वणी:- शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चंद्रपूर मार्गावरील बेलोरा फाट्याजवळ ५० वर्षीय इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. मृतदेहा लगत दगड,दारूच्या बाटल्या व ग्लास असल्याने सदर व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Suspicious body found along Belora road
तालुक्यातील वणी-चंद्रपूर मार्गावरील बेलोरा फाट्याजवळ एका ५०वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत सदर मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
दरम्यान मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृतक व्यक्ती विनायक माधव कुळमेथे रा. सुमठाणा ता. भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. रविवारी बेलोरा फाट्याजवळ असलेल्या बस थांब्या जवळ सदर व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. त्याच्या शेजारी दारूच्या बाटल्या,ग्लास, व दगड होते.

हत्या झाल्याचा संशय?
मृतकाच्या चेहऱ्यावर व मानेवर मारहाणीच्या खुणा असल्याने सदर इसमाचा अज्ञातांनी खून केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतकाचे शवविच्छेदन झाल्यानंतरच पुढील दिशा मिळणार आहे. आता मृतक बेलोरा फाट्यावर कसा आला, सोबत कोण होते. आणि घटनास्थळी मृतकाच्या बाजूला पडलेल्या दारूच्या बाटल्या,ग्लास व दगड यावरून ठाणेदार माधव शिंदे व चमू तपास करीत आहेत.