वणी पंचायत समितीच्या दोन गणाला लागली सभापती पदाची लॉटरी
जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर
वणी:- पंचायत समिती गणाचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. यात दोन पंचायत समिती गणाला सभापती पदाची लॉटरीच लागली आहे. आता प्रमुख राजकीय पक्षाचे दावेदार या दोनही गणातून लढणार असल्याने या मतदार गणाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. Two constituencies of Wani Panchayat Samiti won the lottery for the post of chairman
वणी पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जमाती प्रवर्ग राखीव महिला असल्याने दोन गणामध्ये चांगली चुरस बघायला मिळणार आहे. यात घोंसा पंचायत समिती गण अनुसूचित जमाती सर्व साधारण राखीव असल्याने या गणातून महिला पुरुष निवडणूक लढू शकतो. तर कायर गण अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग राखीव आहे. या गणातून जिंकून येणारी महिला सुद्धा सभापती पदावर विराजमान होते. एकूणच घोंसा, कायर हे दोन्ही गण अनुसूचित जमाती प्रवर्ग राखीव असल्याने येथे चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे.
वणी पंचायत समितीचे आरक्षित गण
वणी पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले ते खालील प्रमाणे.
1.राजूर - Sc जनरल
2.घोन्सा - ST जनरल
3.कायर- ST महिला
4.तरोडा - ना म प्र जनरल
5.शिंदोला- ना म प्र महिला
6.चिखलगाव - सर्वसाधारण महिला
7.नांदेपेरा - सर्वसाधारण
8.शिरपूर - सर्वसाधारण महिला
9.वेल्हाळा - सर्वसाधारण
10.वागदरा - सर्वसाधारण महिला
1.राजूर - Sc जनरल
2.घोन्सा - ST जनरल
3.कायर- ST महिला
4.तरोडा - ना म प्र जनरल
5.शिंदोला- ना म प्र महिला
6.चिखलगाव - सर्वसाधारण महिला
7.नांदेपेरा - सर्वसाधारण
8.शिरपूर - सर्वसाधारण महिला
9.वेल्हाळा - सर्वसाधारण
10.वागदरा - सर्वसाधारण महिला
जिल्हा परिषद आरक्षित गट
1. वागदरा -घोन्सा, नागरिकांचा मागास प्रवर्ग
2. शिरपूर -कायर, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
3. शिंदोला -तरोडा, सर्वसाधारण
4. राजूर -चिखलगाव, सर्वसाधारण
5. नांदेपेरा -वेल्हाळा, सर्वसाधारण

