-->

सरन्यायाधीशांवरील हल्ला मनुवादी व्यवस्थेचे षडयंत्र - राजू निमसटकर

0

 ​

सरन्यायाधीशांवरील हल्ला मनुवादी व्यवस्थेचे षडयंत्र - राजू निमसटकर 

सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याचा झरी येथे 'वंचित बहुजन आघाडी'कडून तीव्र निषेध. 

झरी जामनी तहसीलदारांना निवेदन सादर
आरोपीवर 'देशद्रोहाचा गुन्हा' दाखल करण्याची मागणी. 

संगिनी न्यूज:-  देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या घृणास्पद हल्याचा यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल झरी (जामणी) तालुक्यात वंचित बहुजन आघाडी (VBA) च्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला.  वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत याबाबतचे निवेदन तहसीलदार, झरी (जामणी) यांना सादर करण्यात आले.  Attack on Chief Justice a conspiracy of the Manuwadi system - Raju Nimsatkar  

सरन्यायाधीशांवरील हल्ला मनुवादी व्यवस्थेचे षडयंत्र - राजू निमसटकर

     "देशाच्या सरन्यायाधीशावर न्यायालयीन कामकाजाचे दरम्यान झालेला हा निंदनीय हल्ला केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, तो आपल्या संविधानावर आणि न्यायदानाच्या प्रक्रियेवर केलेला थेट हल्ला आहे." असा हल्लाबोल करीत असतानाच, "सध्या जाती-समूहासमूहांमध्ये आणि धर्मा-धर्मात भेद निर्माण करण्याचे काम देशातील मनुवादी व्यवस्था करीत आहे. सरन्यायाधीशांवरील हा हल्ला त्याच मनुवादी व्यवस्थेचे षडयंत्र आहे." असा थेट आरोपही राजु निमसटकर यांनी यावेळी केला. 
     "या घटनेतील आरोपी वकील राकेश किशोर याच्यावर केवळ निलंबनाची कार्यवाही हे त्याला झालेले शासन पुरेसे नाही. न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी, आरोपी वकिलावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा." न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळू शकतो, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
​     "भविष्याच्या दिवसांत संघटनात्मक बांधणी बरोबरच समाजातील समूह वंचित, आदिवासी, बहुजन, शोषित, पीडित घटकांना संघटित करून वंचित बहुजन आघाडीला सत्ताधारी जमात बनवण्याचा संकल्प यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी केला." 
​     निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन आघाडी, वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्यासह अनंता खाडे, रवींद्र तेलंग, रवी वनकर, प्राणशील पाटील, श्रीराम भोयर, शरद पळवेकर, अनुप भांदककर, अमोल भोयर, रमेश अवतरे, भीमराव वानखेडे, प्रशांत लोहकरे, दत्ता परचाके, प्रेम प्रताप सिडाम, राजू कांबळे, आनंद भांडककर, देवानंद निखाडे, गौतम हस्ते, सुखदेव वाघमारे, निकेश कांबळे, शांताराम देवतळे, नथुभाऊ कोडापे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top