अखेर वसंत जिनिंगचा अध्यक्ष पायउतार!
नवीन अध्यक्ष कोण?
वणी:- वसंत जिनिंग सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या अध्यक्षा विरुद्ध १७ सदस्या पैकी १३ विरुद्ध एक या फरकाने अविश्वास ठराव पारित झाला आहे. यात विद्यमान संचालकांपैकी तीन जणांची अनुपस्थिती होती हे विशेष! मात्र ते तीन कोण? आणि नवा अध्यक्ष कोण? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. Finally, the president of Vasant Jining steps down. 
अखेर वसंत जिनिंगचा अध्यक्ष पायउतार
एकाधिकार, कामात अपारदर्शकता इत्यादी आरोप करीत गेल्या काही काळापासून आशिष खुलसंगे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची टांगती तलवार होती. गेल्या दिड वर्षांआधी लोकसभा निवडणूक असल्याने वरीष्ठांनी यात हस्तक्षेप केला. त्यानंतर हा वाद थांबवण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा अविश्वास प्रस्तावासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. विशेषतः त्याआधीच. खुलसंगे यांच्या एकसूत्री कार्यक्रमाला अनेक संचालक कंटाळले असल्याचे चित्र दिसत होते.
३ नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंगच्या १३ संचालकांनी आशिष खुलसंगे यांच्या विरोधात उभे ठाकत उपनिबंधकांना अविश्वासाबाबत पत्र दिले होते. त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी महाराष्ट्र सहाकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ (१) (३) अन्वये आदेश जारी केला होता. त्यानुसार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दु.१ वाजता वसंत जिनिंगच्या सभागृहात विशेष सभा भरवण्यात आली होती. यात अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. यावर १३ विरुद्ध १ मतांनी हा प्रस्ताव पारीत झाला.
वसंत जिनिंग ऍन्ड प्रेसिंग या सहकारी संस्थेत १७ संचालकांची कमिटी आहे. यात १४ जणांनी मतदान केले तर तीन सदस्य गैरहजर होते. आशिष खुलसंगे यांच्या वाटेला केवळ त्यांचे एक मत प्राप्त झाले. यावरूनच खुलसंगे यांच्यासोबत इतर सदस्य नव्हतेच!
आता नवीन अध्यक्ष कोण?
वसंत जिनिंग सहकारी संस्थेचे अध्यक्ष पायउतार झाले खरे! पण यामागे काँग्रेसचे नेते संचालक होते. नेतृत्वाचा विरोध होता की, त्यांची नेतेगेरी रुचली नाही हा प्रश्न कायमच आहे. तरीसुद्धा काँग्रेस पक्षाच्या माजी तालुकाध्यक्षाचे नाव पुढे करीत कोणता मोठा नेता अध्यक्षपदावर विराजमान होईल हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रमोद वासेकर यांचे नाव पुढे आहे. परंतु वेळीच खलबत होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी वसंत जिनिंगचा नवीन अध्यक्ष कोण? हे जरी ठरले नसले तरी, एक नेता या पदावर बसण्याची चिन्हे आहेत.
