-->

कोळसा खाण परिसरातील समस्यांवर उपाययोजना तात्काळ करा आ. संजय देरकर

0

 

 कोळसा खाण परिसरातील समस्यांवर उपाययोजना तात्काळ करा आ. संजय देरकर 

वेकोली  अधिका-यांच्या आढावा बैठकीत विविध प्रश्नांचा निपटारा


वणी: /-  वणी वेकोली क्षेत्रातील गावांमध्ये कोळसा खाणीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार संजय देरकर यांनी वेकोली अधिकाऱ्यांना दिल्या. ४ नोव्हेंबर रोजी ऊर्जाग्राम ताडाळी चंद्रपूर येथील वेकोली कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत  विविध गावांतील समस्या मांडत त्यावर त्वरित कारवाईचे निर्देश दिले. या बैठकीस वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वेकोलिग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. Take immediate measures to address the problems in the coal mine area. Sanjay Dekar।

कोळसा खाण परिसरातील समस्यांवर उपाययोजना तात्काळ करा आ. संजय देरकर 


    वणी एरिया कोळसा खाण परिसरातील अमेरिकन बाभळीच्या जंगलामुळे वाघाचा वावर वाढला असून, याचे सर्वेक्षण करून झाडझुडपे तात्काळ साफ करावीत. तसेच, वेकोलीशी संलग्न कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार द्यावा. प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा बैठकीत चर्चीला गेला. उकणी गावातील काही जमिनी अद्याप वेकोलिने अधिग्रहीत केलेल्या नाहीत. या जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे, इत्यादी सूचना विद्यमान आमदार संजय देरकर यांनीदिल्या आहेत.

     वेकोलि अधिकाऱ्यांनी सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या आरोग्य समस्या लक्षात घेता, प्रत्येक गावात आरोग्य तपासणी शिबिरे (हेल्थ कॅम्प) आयोजित केली जाणार आहेत. चारगाव चौकी ते शिंदोला रस्त्यावर दोन दिवसांत पाण्याचे टँकर फिरवले जातील. सीएसआर अंतर्गत येणा-या गावात पांदण रस्ते बांधले जातील. असे वेकोलि अधिका-यांनी सांगितले. बैठकीत स्थानिकांनी ओव्हरबर्डन व घुग्घुस येथील भुस्खलनातील पीडितांना नुकसान भरपाईचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. 

बैठकीस क्षेत्रीय महाप्रबंधक यांच्यासह वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, सरपंच रुपेश ठाकरे, सरपंच ज्ञानेश्वर टोंगे, सरपंच स्वाती राजुरकर, उपसरपंच अजय चटप, डॉ. विलास बोबडे, लुकेश्वर बोबडे, संदीप थेरे, राजू यादव, दिलीप ताजने, चेतन बोबडे संदीप जेनेकर नरेंद्र नांदे यांच्यासह नायगाव, टाकळी, कोलगाव, साखरा निलजई, बेलोरा, मुंगोली, शिवणी जहांगिर, उकणी, चिंचोली आदी गावांतील लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top