स्त्री शक्तीचा सन्मान अन,जनतेला आशेचा किरण!
विरोधी उमेदवारांना भरली धडकी.
वणी/:- विधानसभेचे विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या पत्नी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या संस्थापिका किरण देरकर यांनी वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. मागील काळातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याने प्रत्येक प्रभागात त्यांची स्वतःची ओळख आहे. आजवर स्त्री शक्ती फाउंडेशन च्या माध्यमातून त्या जनतेत मिसळल्या आहे. आता किरण देरकर सर्व मविआ आघाडीच्या उमेदवारासाठी मैदानात उतरल्या आहेत, परिणामी देशातल्या मोठ्या पक्षाला किरण देरकर यांचे आव्हान पेलणार का? हे बघणे महत्वाचे आहे. Respect for women's power, a ray of hope for the peopleइ
किरण संजय देरकर या तळागाळातील महिलांच्या प्रश्नांना उभारी देत "सन्मान स्त्री शक्तीचा" फाउंडेशन च्या माध्यमातून गेली काही वर्षे कार्यरत आहेत. आज घडीला कार्याचे फलित होण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.
शहरातील प्रत्येक प्रभागात विद्यमान आमदार संजय देरकर हे अग्रस्थानी आहेत
महिला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अनुभव अन त्या काळातील अनुभव व जनतेच्या भेटीगाठी यातच त्यांचा विजय असल्याचे सध्यातरी दिसते आहे. एकूणच जनतेच्या आशेचा किरण महाविकास आघाडीला शिक्कामोर्तब करणार असल्याचे त्यांच्या प्रचार मोहिमेने दिसणारच आहे. इतकेच नव्हे त्यांच्या अर्धांगिनी किरण या विधानसभा निवडणुकीत असलेली ताकत दाखवत मैदानात उतरल्या आहेत.
वणीच्या राजकारणात आशेचा किरण!
अंतर्गत राजकारणाने त्यांना पदावरून खाली यावे लागले खरे, मात्र जिद्द अन चिकाटी मनात घेऊन व सायकल स्वार होत दरम्यान त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण आला. म्हणजेच!.... स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका किरण संजय देरकर.
आज घडीला समाजकारण व महिला सक्षमीकरण हाच ध्यास घेत जनतेला आशेचा किरण दिसायला लागला आहे.

