प्रभाग एक च्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध विचारशक्ती
कोण उडवणार धुरळा?
प्रभाग एक च्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध विचारशक्ती
वणी/ :- नगर पालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम जोरात आहे. सध्यातरी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत ठाकरे शिवसेनेचा उमेदवार सरस ठरताना दिसतो आहे. यातच शहरातील प्रभाग एक मध्ये धनशक्ती विरुद्ध विचारशक्ती समोरासमोर ठाकल्याने मतदार धनशक्ती कडे वळणार की विचारशक्ती कडे यावरच प्रभाग एक चे भवितव्य अवलंबून आहे. Power of money versus power of thought in the Ward 1 election
शहरातील प्रभाग दोन हा भाग सुशिक्षित भाग म्हणून गणल्या जातो आहे. या भागात महाविकास आघाडीचे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार (संभाजी ब्रिगेड) अजय धोबे व प्रणाली देऊळकर हे आहेत. सोबतच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ संचिता विजय नगराळे अन त्यांचे कार्य दोन्ही उमेदवारांना बळ देणारे असल्याने. वैचारिक वारसा जोपासत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तरीसुद्धा १९९१ पासून नगर परिषद ची तण मन धनाने कार्य करणारे सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारे नेतृत्व विद्यमान आमदार संजय देरकर यांचे मार्गदर्शन व नेतृत्व आणि विचार ही निवडणूक गाजविणार असल्याचे चित्र दिसायला लागले आहे. बाकी मतदार सुज्ञ आहेच.Power of money versus power of thought in the Ward 1 election
तर! दुसरीकडे भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कमकुवत असल्याची जोरदार चर्चा जन माणसात आहे. आता माजी आमदारांची व उमेदवारांची धनशक्ती अन सत्तेतील दबाव विचार शक्तीला हरविणार की, काय? हे बघणे सुजाण मतदारांच्या हातात आहे. माजी आमदार कर्तृत्वाच्या भरवशावर की,सत्तेच्या. हे सध्यातरी प्रशासकीय खेळीत दिसत आहे. मात्र त्यांना शह देण्यासाठी विद्यमान आमदार सज्ज असल्याचे बघायला मिळते आहे. Power of money versus power of thought in the Ward 1 election
एकूणच संपूर्ण वणी नगर पालिकेत शिंदे शिवसेना गटाने माजी आमदारासमोर जणू आव्हान दिले असले तरी, उमेदवारांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे चित्र दिसायला लागले आहेत. सध्यातरी महाविकास आघाडीला जनतेने डोक्यावर घेत जनतेचा कौल बदलत असल्याचे बघायला मिळते आहे.
प्रभाग एक मधील पुरुष उमेदवारा मध्ये धनशक्ती विरुद्ध विचारशक्ती असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना शिंदे गटाने भाजपाला लावला सुरुंग.
भाजपात दुफळी माजली असल्याचे सर्वश्रुत आहे. भाजप मध्ये पूर्वी असलेले नेते आता शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. परिणामी भाजपचा दुसरा गट व महायुती मधील शिंदे सेना यांनी माजी आमदाराला जणू सुरुंगच लावला आहे. यावरूनच ठाकरे सेनेकडे मतदार झुकण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. यातच माजी आमदारांना अनेक आव्हानाचा सामना करावा लागणार हे स्पष्ट चित्र दिसायला लागले आहे. स्वगृहातूनच विरोध अन जातीधर्माचे राजकारण त्यांना भोवणार हे निर्विवाद सत्य आहे.
सामान्य जनतेसाठी ही निवडणूक
आज घडीला सर्वसामान्य माणूस गेल्या अकरा ते बारा वर्षांपासून भरडतो आहे. केवळ आपलं चांगभलं करणे इतकाच ध्यास सत्ताधारी घेत आहे. आजघडीला गेल्या अकरा वर्षात आपण काय कमावले,अन काय गमावले हे बघणे महत्वाचे आहे. ही निवडणूक भाजपाला जड जाण्याची जोरदार चर्चा रंगायला लागली आहे.