काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी विकेश पानघाटे
वणी:-/
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांसंदर्भात संघटनात्मक मजबुतीकरणासाठी काँग्रेस पक्षाने वणी तालुकाध्यक्षपदी विकेश पानघाटे यांची निवड केली आहे. Vikesh Panghate appointed as Congress taluka president 
काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी विकेश पानघाटे
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करीत विविध पदाच्या नियुक्त्या केल्या आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठका घेत सर्व जिल्हाध्यक्षांना फेरबदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रसंगी यवतमाळ जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल मानकर यांनी वणी तालुकाध्यक्षपदी विकेश भास्करराव पानघाटे यांची निवड केली आहे.
काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता झाला अध्यक्ष
गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता विकेश पानघाटे यांनी युवक काँग्रेसचे पद भूषवित जबाबदारी पार पाडली होती. अखेर काँग्रेस पक्षाने एकनिष्ठ कार्यकर्त्याला तालुक्याची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीचे श्रेय खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर , ऍड देविदास काळे, प्रदेश सचिव संजय खाडे आणि समस्त पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
