विषारी द्रव्य प्राशन करून महिलेची आत्महत्या
भालर येथील घटना
वणी:-/ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भालर येथील ४५ वर्षीय महिलेने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. Woman commits suicide by consuming poison। .jpeg%20poison.jpg)
विषारी द्रव्य प्राशन करून महिलेची आत्महत्या
तालुक्यातील भालर येथील संध्या राजू जेऊरकर ही महिला सकाळी आठ वाजताचे सुमारास कापूस वेचण्यासाठी जातो असे सांगून घरून गेली. व गावातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तिने विषारी द्रव्य प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तिला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा मृत्यू झाला होता.
