महिलेची विष प्राशन करून आत्महत्या
वणी:-/ मुकुटंबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ईजासन येथील ५५ वर्षीय महिलेने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.
![]() |
| महिलेची विष प्राशन करून आत्महत्या |
तालुक्यातील ईजासन येथील संगीता विठ्ठल निळे या ५५ वर्षीय महिलेने मंगळवारी रात्री १० वाजताचे सुमारास राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब कुटुंबातील सदस्यांना लक्षात येताच तिला तात्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण मात्र अस्पष्ट आहे. Woman commits suicide by consuming poison

