-->

पालिका निवडणुकीत ऐनवेळी उत्सुकांच्या कोलांटउड्या

0

 पालिका निवडणुकीत ऐनवेळी उत्सुकांच्या कोलांटउड्या


वणी:-/  नगर पालिकेच्या रिंगणात आघाडी महायुती  गणित बिघडले.  मात्र यात आघाडीने एक पाऊल पुढे टाकत आपले उमेदवार दिले.  याउलट महायुतीने या निवडणुकीत जणू फारकत घेत सत्तेतील मित्र पक्षासमोर जणू आव्हानच दिले आहे.  याचं पार्श्वभूमीवर नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऐन वेळी कोलांटउड्या मारत नेत्यांना घाम फोडला असल्याचे बघायला मिळाले आहे.

पालिका निवडणुकीत ऐनवेळी उत्सुकांच्या कोलांटउड्या
पालिका निवडणुकीत ऐनवेळी उत्सुकांच्या कोलांटउड्या


     सध्या राज्यातील महायुती सरकार सत्तेत आहे.  यात भाजप,शिंदे सेना, राष्ट्रवादी (अजित पवार) हे पक्ष सामील आहेत.  मात्र वणीत वेगळेच चित्र बघायला मिळते आहे.  भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत असलेले विजय चोरडिया यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.  इतकेच नव्हे भाजपाला सुरुंग लावत शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांचा देखील पक्ष प्रवेश करून घेतला आहे.  सध्यातरी चोरडिया यांनी माजी आमदार बोदकुरवार यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहेत.  परिणामी मतविभाजनाचा फटका भाजपला यानिमित्ताने बसणार काय?  असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  तर दुसरीकडे माजी आमदारांनी आपल्या जवळीक लोकांना उमेदवारी दिल्याने माजी नगराध्यक्ष गट नाराज असल्याचे दिसते आहे.  केवळ उमेदवारीचे आमिष दाखवून उमेदवारी दिली खरी, मात्र निवडून आणण्यासाठी माजी आमदारांचा या निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे. The excitement of the people is just in time for the municipal elections.


    तर दुसरीकडे विद्यमान आमदार संजय देरकर यांचे पालिकेवर नेहमीच प्राबल्य राहिले आहे.  या निवडणुकीत काँग्रेस,मनसे व इतर घटक पक्षाला सोबत घेत त्यांनी जमेची बाजू घेतली आहे.  नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आरोग्य क्षेत्रातील महिला दिली असल्याने जनता प्राधान्य देणार असल्याचा विश्वास त्यांना आहे. आघाडीतील माजी आमदार वामनराव कासावार, मनसे नेते राजू उंबरकर ,विद्यमान आमदार संजय देरकर व इतर घटक पक्षातील नेते वणी नगर पालिका निवडणुकीच्या मैदानात ताकतीने उभे असल्याचे दिसते आहे.


कोलांटउड्या


    परवा पर्यंत पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते असलेले अन स्वतःच उखळ पिवळे करण्यासाठी प्रवेश घेणारे म्हणजेच?....

    खरच हे जनतेचे सेवक होते,की पक्षाचे एकनिष्ठ शिलेदार?  जर शिलेदार असते तर, पक्ष भूमिका महत्वाची होती.  मात्र तसे घडले नाहीच.  ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी दुसऱ्या पक्षाची कास धरली.   यावरूनच हे जनतेला गाजर देऊन कोहळा काढणारेच म्हणावे लागेल. The excitement of the people is just in time for the municipal elections.

 

   चोरडियांचा झंझावात


     माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व विजय चोरडिया यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे.  यातच चोरडिया यांनी भाजपला रामराम ठोकत शिंदे सेनेत जाहीर प्रवेश घेतला.  अन भाजपला सुरुंग लावण्याचे काम सुरू केले.  परिणामी काही प्रमाणात भाजपात फूट पडली.  तर दुसरीकडे माजी आमदारांनी निकटवर्तीय कार्यकर्त्यांना उमेदवारी बहाल केली.  याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  सध्यातरी वणी नगर परिषद निवडणुकीत चोरडिया पूर्ण ताकतीने मैदानात उतरल्याने निवडणुकीला चांगलाच ज्वर पसरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top