अपचनाचा त्रास चुटकीत गायब.
पचनसंस्था सुधारणार,पोट साफ..
वणी:- सध्याच्या काळात बहुतांश लोकांना अपचनाचा त्रास होतो. करपट ढेकर,भूक न लागणे, पोट साफ न होणे आदी व्याधी नित्याचाच झाल्या आहेत. यासाठीच आपल्याला अगदी सोईस्कर उपाय देत आहोत. The problem of of indigestion disappears in a pinch
सध्याचा काळ धकाधकीचा आहे. वेळेवर जेवण नाही, बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे, त्यात थंडीचा त्रास परिणामी पोटाची संपूर्ण क्रियाच बदलते. मग सुरू होतात ढेकर,पोट गच्च असणे,पोटात वायू तयार होणे .अशा समस्या निर्माण होतात. मग कामात मन लागत नाही. शरीराचे दुखणे वाढते,डोकेदुखी ना ना तर्हेचे त्रास सुरू होतात. The problem of indigestion disappears in a pinch
हा त्रास जर कमी करायचा असेल तर आपल्या स्वयंपाक घरात असलेले जिरे,सोपं,ओवा यावर रामबाण उपाय आहे. त्यासाठी दोन चमचे जिरे, एक चमचा ओवा,व दोन चमचे सोप(बडीशेप) तव्यावर भाजून घ्या, व एक ग्लास पाण्यात मंद आचेवर उकळायला घ्या. एक ग्लास पाण्याचा एक कप होईपर्यंत उकळा आणि साधारण कोमट असतांना चहा जसा पितो तसे सकाळी उपाशीपोटी प्या. या घरगुती उपायांनी अपचन,पोटातील जंत, ऍसिडिटी दूर होईल. नियमितपणे हा उपाय केल्याने पोटाच्या अनेक तक्रारी दूर होतील. एकदा करून बघा ओवा जंत नाशक आहे. सोप पचनशक्ती वाढवते, आणि पोट साफ होते. तर जिरे शरीरात तयार झालेल्या वायुवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते. म्हणजेच मुळव्याध होण्यापासून बचाव सुद्धा होतो.
एकदा करून बघा वरील उपाय नक्कीच फायदा होईल.