सुगंधित तंबाखू घेऊन जाणारा एलसीबीच्या जाळ्यात
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना.
एक लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त.
वणी:- शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायर जवळील पठारपूर फाट्यावर दुचाकीने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या नेरड येथील तरुणास एलसीबीच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची घटना १७ फेब्रुवारीला घडली आहे.
वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कायर जवळील पठारपूर फाट्यावर एक इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पथकाला १७ फेब्रुवारीच्या पहाटे तीन वाजता मिळाली. त्यानुसार पथक कायर कडे रवाना झाले. पठारपूर फाट्यावर येऊन पथकाने सापळा रचला होता. दरम्यान एक तरुण दुचाकीवरून येत असल्याचे दिसताच त्याला अडविले. व त्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. लगेच दुचाकीवर बांधून असलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोणीची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला दोनशे ग्रॅम वजनाचे ८० पॉकेट, ईगल चारशे ग्रॅम वजनाचे १४ पॉकेट, दोनशे ग्रॅम वजनाचे २० पॉकेट, होला हुक्का दोनशे ग्रॅम वजनाचे ५० पॉकेट,असा सुगंधित तंबाखू साठा, दुचाकीसह नेरड(पुरड) येथील नितीन कवडू राजूरकर(३२) याला एक लाख ८८ हजार एकशे ६० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.In the net of LCB carrying flavored tobacco
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचेसहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे, पोलीस उपनिरीक्षक राम कांडुरे, सुनील खंडागळे,ययोगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर,निलेश निमकर,रजनीकांत मडावीआदी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहेIn the net of LCB carrying flavored tobacco.