रेल्वे सायडिंगच्या प्रदूषणाने राजूरवासी त्रस्त.
प्रदूषणाने परिसरात दुर्धर आजार बळावले.
प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे दुर्लक्ष, बोर्डाचा नियमांचे सर्रास उल्लंघन.
वणी : वणी तालुक्यातील राजूर हे गाव कोळसा, चुना व चुना दगड ह्याचे प्रचुर उत्पादन करणारे गाव आहे. परंतु गावात चालणाऱ्या उद्योगांमुळे व व्यवसायामुळे मात्र गावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात वाढ झाली आहे. परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याकडे प्रदूषण नियामक मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप करीत समस्यांचे निवेदन राजूर बचाव संघर्ष समितीने संबंधित विभागाला दिले आहे.Rajur residents are suffering from the pollution of railway siding.
मागील दोन वर्षांपासून राजूर रेल्वे सायडिंग वर कोळशाची वाहतूक सुरू झाली आहे. येथील कोल वॉशरी मधून रेल्वे सायडिंग वर मोठ्या ट्रकच्या माध्यमातून कोळशाची वाहतूक केल्या जाते आहे. रेल्वे सायडिंग वर जमा केलेला कोळसा मशिनद्वारे रेल्वे वॅगन मध्ये भरल्या जाते. सदर काम रात्रंदिवस केल्या जात असल्याने कोळशाच्या धुळीचे प्रचंड साम्राज्य परिसरात पसरले आहे. या धुळीच्या प्रदूषणाने परिसरातील तसेच गावातील नागरिकांना श्वास घेताना त्रास होतो आहे. कोळशाचे बारीक कण त्यांचा फुफुसात जात असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. दमा, अस्थमा, टी बी व कॅन्सर, किडनीचे आजार यासारखे दुर्धर आजार झाले आहे.
गावात कोणतेही प्रदूषण निर्माण करणारे उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याआधी गावातील ग्रामसभेची मंजुरी तथा प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु सदर उद्योग व्यवसाय बड्या भांडवलदारांची असल्याने प्रशासन कार्यवाही करण्याऐवजी संबंधितांना मुक संमती देत असल्याचे आरोप करण्यात आले आहे. परिणामी या बाबीचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागत आहे. Rajur residents are suffering from the pollution of railway siding.
रेल्वे सायडींडमुळे होणाऱ्या प्रदूषणाने राजूर परिसरातील जनतेला मरणयातना भोगावे लागत आहे. या होणाऱ्या प्रदूषणाचा भस्मासुर थांबविण्यासाठी राजूर बचाव संघर्ष समितीचे माध्यमातून संबंधित विभागांना १५ फेब्रुवारी ला निवेदन देत खालील बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे नियमानुसार व आदेशानुसार सायडिंग वर स्प्रिंकल्स लावावे, कोळशाचे ढिगारे कमी ठेऊन त्यावर ताडपत्री झाकावी, रस्त्यावर सातत्याने पाणी मारावे, वृक्ष लागवड करावी, प्रदूषणात वाढ करणारे वैध व अवैध कोल डेपो बंद करावे, रींगरोडवर पसरणारी कोळशाची भुकटी दररोज उचलून रस्ता स्वच्छ ठेवावा, आदी मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी राजूर बचाव संघर्ष समितीचे मो. असलम, सुशील अडकिने, कुमार मोहरमपुरी, जयंत कोयरे उपस्थित होते.

