लालगुडा ग्रामपंचायत ने घेतला EVM बंदीचा ठराव.
लालगुडा ग्रामपंचायतीत क्रांतिकारक ठराव पारित.
Lalguda Gram Panchayat took a resolution to ban EVMs.
वणी :- येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लालगुडा ग्राम पंचायतीने २६ जानेवारीच्या धर्तीवर संपन्न होणाऱ्या ग्रामसभेत निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनला (EVM) निवडणुकीत बंदी घालावी या करिता एकमताने क्रांतिकारक ठराव पारित केला आहे.
राज्य व केंद्र निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करून घेण्यात येत आहे. परंतु या यंत्राचा कोणताही विश्वास जनतेत उरला नसल्याने सर्वत्र या यंत्राच्या विरोधात ओरड होत आहे. परिणामी लोकशाही वाचली पाहिजे मतदाराला आपण दिलेले मत योग्य ठिकाणी केले की नाही. याबाबत भरोसा निर्माण व्हावा याकरिता वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लालगुडा ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत सदस्या शारदा मेश्राम यांनी ईव्हीएम बंदी बाबत ठराव मांडला असता त्याला अनिल डांगे यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते एक क्रांतिकारक निर्णय पारित झाला व येत्या लोकसभा,विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर न करता मतदानासाठी कागदी मतपत्रिकेचा वापर करावा असा ठराव घेण्यात आला आहे. यावेळी सरपंच्या सौ. गीता उपरे व ग्रामसेवक हनुमंत गिरी यांनी स्वाक्षरी करून पुढील कारीवाही पूर्ण केली आहे. ईव्हीएम धांदलीचे प्रकार भरपूर प्रमाणात ऐकायला येत आहे. मात्र निवडणूक आयोग यावर गप्प असल्याचे आरोप जनतेतून होत आहे.Lalguda Gram Panchayat took a resolution to ban EVMs.

.jpeg)