वणीत हंबरते गाय वासराची या नाटकाची मेजवानी.
अस्सल मनोरंजन करणारे झाडीपट्टीतील नाटक.
वणी, रवी ढुमणे
वणी येथील जत्रा मैदानात भव्य विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विनोद राऊत लिखित व मुन्नाभाई बिके दिग्दर्शित हंबरते गाय वासराची या हृदयस्पर्शी व विनोदी नाटकाचे आयोजन २१ फेब्रुवारी ला जत्रा मैदानात करण्यात आले आहे.
वणीत रंगनाथस्वामी अर्बन लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे व मित्र परिवाराने भव्य विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन २० ते २२ फेब्रुवारी ला करण्यात आले आहे. प्रसंगी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आयोजकांनी एकता नाट्य कला मंच वडसा झाडीपट्टीतील, निर्मित हंबरते गाय वासराची या नाटकाचे आयोजन केले आहे. या नाटकाचे निर्माते ताजुल उके, लेखक विनोद राऊत, मुन्नाभाई बिके यांचे दिग्दर्शन व त्यांच्या अभिनयाची पर्वणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या नाटकात प्रमुख भूमिका राहुल वासनकर, प्रवीण वाघमारे,लेखाराम हुलके, निकेश खोबरे, अविनाश सहारे, लालू पेंदाम, प्रदीप उके, सोनल गोरखे, करिष्मा भाग्यवंत, ज्योती राऊत, स्नेहल गेडाम,बाल कलाकार यश कुमार यांची असणार आहे. यात निकेश खोबरे यांचे स्वर व झाडीपट्टीतील कलावंतांच्या अभिनयाने मनोरंजन करणारे बहुचर्चित नाटक हंबरते गाय वासराची या नाटकाचा प्रयोग वणीत २१ फेब्रुवारी ला सायंकाळी सहा वाजता जत्रा मैदानात होणार आहे.Wanit Humbarte cow calf feast of this play.
या हृदयस्पर्शी, मनोरंजक नाटकाचा नाट्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे मित्र परिवाराने केले आहे.



