साहेब रुग्णवाहिका दिली पण "रेफरच काय?"
वणी:- आमदार साहेबांनी वणी ग्रामीण रूग्णालयात रुग्णांना सुविधा मिळण्यासाठी रुग्णवाहिका दिली आहे.मात्र येथील गर्भवती महिला व सर्पदंश झालेले रुग्ण अद्यापही रेफर होत आहे. गेल्या आठ वर्षांपासून रुग्णकल्यानं समिती कार्यरत होत असताना साहेबांचे या गंभीर प्रश्नाकडे जणू दुर्लक्ष होतांना दिसत आहे. "आमदार साहेब ट्रामा केअर युनिट असतांना आपण गप्प का?हाच खरा प्रश्न आहे.Sir, the ambulance was given, but what about the referral?
जनतेची सेवा करण्यासाठी येथील विधानसभा मतदार संघातील लोकांनी काम करणारा माणूस म्हणून आमदारांना दुसऱ्यांदा चान्स दिला आहे. मात्र शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शासनाने पांदण रस्ते योजना कार्यान्वित केली आहे.परंतु गेल्या तीन वर्षांपासून येथील एकही पांदण रस्ता अद्याप तयार करण्यात आला नाही. सोबतच वणी ग्रामीण रुग्णालयाची अवदसा झाली असतांना साहेबांनी नियुक्त केलेली रुग्णकल्यानं समिती पुढारपणात वावरत आहे. गर्भवती मातांना प्रसूतीसाठी चंद्रपुरात जावे लागत आहे. एकीकडे सबका साथ सबका विकासाचा नारा देणारे आमदार यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतांना दिसत नाही हेच वणी मतदार संघाचे दुर्दैव आहे. एक रुग्णवाहिका प्रदान केली त्याचा उहापोह होत आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयात काय चालू आहे. हे रुग्णकल्यानं समितीला ठाव नाही हीच खरी शोकांतिका आहे. एकदा साहेबांनी येथील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणून गरीब रुग्णांना न्याय द्यावा हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे. नाहीतर "दोन हाणा पण साहेब म्हणा" अशी गत सध्यातरी दिसते आहे. करंजी येथून रुग्णालयाचा कारभार लिपिक बघत असतांना साहेब गप्प का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. एकूणच साहेब केवळ प्रसिद्धीसाठी सगळे काही करत असल्याचे यावरून दिसते आहे. रुग्णवाहिका देण्यापेक्षा रुग्णालयात लक्ष देणे गरजेचे आहे. यातच सामान्यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे.

