शेतकरी शिक्षण संस्था अध्यक्षांचे दुःखद निधन.
जीवन पाटील कापसे यांचे दुःखद निधन.
वणी:- शेतकरी शिक्षण संस्था व कला वाणिज्य,विज्ञान मारेगाव महाविद्यालयाचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा मारेगाव येथील राहते घरून दुपारी चार वाजता निघणार आहे. The sad demise of the president of Shetkari Shikshan Sanstha.
मारेगाव येथील प्रतिष्ठित जीवन पाटील कापसे यांनी समाजकारणात संपूर्ण आयुष्य घालवले. मारेगावात महाविद्यालय सुरू केले. परिणामी मारेगाव तालुक्यात महाविद्यालयीन शिक्षण घेणे सोयीचे झाले होते. त्यांचे राजकीय वलय सुद्धा खूप मोठे होते. त्यांच्या निधनाने समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात खूप मोठा आप्तपरिवार आहे.
आज सोमवारी दुपारी चार वाजता स्व.जीवन पाटील कापसे यांच्या पार्थिवावर मारेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.