-->

महिलांना उपयुक्त पिंपळाच्या पानांचा रस काढा Pimpal leaves juice extract useful for women

0

महिलांना उपयुक्त पिंपळाच्या
पानांचा काढा...

महिलांचे अनेक आजार बरे करणारे पिंपळाचे पान...



वणी:- पूर्वी नवनवीन सुविधा नव्हत्या परिणामी लोक नैसर्गिकरित्या उपचार घेत होते. यात अनेक वृक्ष,वेल,पाने,मूळ, साल,फळ अशा विविध भागांचा उपयोग करण्यात येत होता. यातीलच एक महत्वाचे वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष, याला बोधिवृक्ष म्हणून संबोधले जाते. याच वृक्षाखाली बसून तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, म्हणून पिंपळाच्या वृक्षाला 'ज्ञानाचा वृक्ष' म्हटले जाते.Pimpal leaves juice/extract useful for women..


Sangini News
महिलांना उपयुक्त पिंपळाच्या पानांचा रस काढा Pimpal leaves juice extract useful for women





    आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचे शरीराकडे दुर्लक्ष होते. परिणामी अनेक व्याधी डोके वर काढतात. यातच महिलांना मासिकधर्म,ओटीपोटात त्रास, वंध्यत्व,श्वेतप्रदर, cholesterol ,पोट साफ न होणे,त्वचा टवटवीत न दिसणे आदी समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांच्या तक्रारी दूर करण्यासाठी पिंपळाच्या पानांचा रस किंवा काढा खूप उपयोगी पडतो. तसे बघता महिला,पुरुष, तरुणींना सुद्धा पिंपळाच्या पानांचा खूप फायदा होतो. महिलांना मासिक पाळीच्या वेळी असह्य वेदना होत असतात त्यावर नैसर्गिक उपाय म्हणून कमीतकमी सात,किंवा १५ दिवस काढा किंवा रस घेतल्याने अनेक तक्रारींचे निवारण होते.Pimpal leaves juice/extract useful for women..

Read more


काढा तयार करण्यासाठी पिंपळाची सात पाने घ्या, ती मिठाच्या पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर एक ग्लास पाण्यात सात पाने टाकून ती एक कप होईपर्यंत उकळून घ्या व तयार झालेला काढा सकाळी उपाशीपोटी पिऊन घ्या. त्यानंतर किमान २० मिनिटे चहा किंवा नाश्ता करू नका. याच प्रकारे पानांचा रस तयार करा. पिंपळाची पाच किंवा सात पाने घ्या, ती मिठाच्या पाण्याने स्वच्छ करून घ्या, व घरी असलेल्या खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये, थोडे पाणी घालून कुटून घ्या व ते फडक्याने पिळून दोन चमचे रस काढून सकाळी उपाशीपोटी घ्या. किमान सात दिवस काढा घेतल्यावर लगेच त्याचे परिणाम दिसून येईल.

      हा काढा घरातील पुरुष,महिला,तरुण,तरुणींना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. सदर उपाय घरगुती आहे. त्यामुळे वैद्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. असेच नवनवीन घरगुती उपाय आपणासाठी घेऊन येणार आहोत.



Disclaimer:-
This article is for your information only. This portal does not make any claim about the authenticity of any of the medicines and remedies in this article. Also, the remedies in the said article should be done at one's own responsibility and before taking the medicine and before taking the remedy, one should consult an expert. This portal will not be responsible for any inconvenience caused by the solutions in this article.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top