कायर येथील शिक्षकाची विष पिऊन आत्महत्या
भुडकेश्वर मंदिर परिसरातील घटना
वणी:- शिरपूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या कायर येथील एका खाजगी शाळेत शिक्षक असलेल्या ३६ वर्षीय शिक्षकाने लगतच असलेल्या भुडकेश्वर मंदिर परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारचे सुमारास उघडकीस आली आहे.A teacher from Kayar committed suicide by drinking poison.
तालुक्यातील साखरा(दरा) येथे राहणारा बळी कवडू जुमनाके हा सुशिक्षित तरुण कायर येथील एका खाजगी शाळेत नोकरीवर लागला होता. परिणामी तो कुटुंबासह कायर येथेच राहायला आला होता. सदर शिक्षकाच्या कुटुंबातील बरेच जण शासकीय सेवेत आहेत. रविवारी सदर शिक्षकाने लगतच असलेल्या भुडकेश्वर मंदिर परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले. व तो तेथेच पडून राहिला. काही वेळाने तो लोकांना पडलेल्या अवस्थेत दिसला. लोकांनी जवळ जाऊन बघितले असता सदर शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता.A teacher from Kayar committed suicide by drinking poison.
या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून बळी जुमनाके चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
सदर शिक्षक, पत्नी व लहान मुलीसह कायर येथे वास्तव्यास होता. बहीण सुद्धा शिक्षिका आहे. संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असतांना या शिक्षकाने आत्महत्या का केली. हे अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.