वयोवृद्धांच्या काठीचा आधारच हरपला
वणी:- गावातील प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला त्यांच्या म्हातारपणी स्वतःहून काठी तयार करून घरपोच स्वतःहून नेऊन देणारा वयोवृद्धांचा काठीचा आधार वयाच्या ९६ व्या वर्षी (विठ्ठल) अनंतात विलीन झाला आहे.The support of the old man's stick was lost.
वणी तालुक्यातील ढाकोरी गावातील ९६ वर्षीय विठ्ठल राजेश्वर कवरासे हे पंढरीचे वारकरी होते. दरवर्षी न चुकता पंढरीची वारी नित्यनेमाने करायचे. इतरांचं भलं त्यात आपलं भलं हे ब्रीद घेऊन ते गावातील वृद्ध लोकांसाठी म्हातारपणी चालायला जो आधार हवा असतो तो म्हणजे काठी. काठ्या तयार करणे हा त्यांचा छंदच होता. काठी तयार करून ती गावातील वृद्ध व्यक्तीच्या घरी पोहचवून देणे हा नित्यक्रम त्यांनी जोपासला होता. पांडुरंगाच्या भक्तीत रंगलेल्या या विठ्ठलाने मानव सेवा हीच ईश्वरसेवा अंगीकृत करीत आयुष्य घालवले. सोबतच अनेक छंद ही या विठ्ठलाने जोपासले होते.The support of the old man's stick was lost.
रविवार १० मार्च ला सायंकाळी पाच वाजता वयोवृद्धांना काठीचा आधार देणारा विठ्ठलच अनंतात विलीन झाला आहे. त्यांच्या मागे दोन मुले,दोन मुली,नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.
सोमवारी होणार अंत्यसंस्कार
वयोवृद्धांचा काठीचा आधार असलेल्या विठ्ठल कवरासे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ढाकोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
या समाजसेवकाला वाचकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.