वर्धा नदीत बुडालेल्या युवकांचे मृतदेह गवसले.
तिसऱ्या दिवशी मिळाला हर्षल चा मृतदेह
Bodies of drowned youths found in Wardha river.वणी.:- येथील विठ्ठलवाडी भागात राहणारे तीन युवक पाटाळा नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली होती. प्रसंगी त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक तैनात झाले होते. शनिवारी दोघांचे मृतदेह पथकाला गवसले. आणि रविवारी एकाचा मृतदेह पथकाला नदीत तरंगत असतांना सापडला आहे. परिणामी कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला आहे.
वणी शहरातील विठ्ठलवाडी भागातील ११ युवक वरोरा तालुक्यातील भटाळी येथे यात्रेला गेले होते. यात्रेवरून परत येत असताना वाटेत येणाऱ्या पाटाळा येथील वर्धा नदीत पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. यातील हर्षल चाफले हा १६ वर्षाचा युवक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला पोहता येत नव्हते. त्याला वाचविण्यासाठी भाऊ अनिरुद्ध चाफले २२ याने नदीत उडी घेतली. पण त्यालाही पोहता येत नसल्याने तो सुद्धा गटांगळ्या खाऊ लागला. दोघांनाही वाचविण्यासाठी संकेत नगराळे २७ या तरुणाने नदीत उडी घेतली खरी पण तो सुद्धा बुडाला. इतर मित्रांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. आणि तिघेही नदीत बुडाले. या घटनेची माहिती माजरी,वणी पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र कोणाचाही थांगपत्ता लागला नाही. शेवटी पोहण्याचा मोह आवरला नसल्याने हा दुर्दैवी अपघात घडला आहे.Bodies of drowned youths found in Wardha river.
शनिवारी दोघांचे मृतदेह गवसले
माजरी पोलिसांनी चंद्रपूर येथील बचाव पथकाला पाचारण केले. बचाव पथक शनिवारी शोध घेत असताना संकेत व अनिरुद्ध चा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. पोलीस यंत्रणा व बचाव कार्य पथक युद्धपातळीवर शोध घेत होते. अखेर रविवारी हर्षल चा मृतदेह पथकाला गवसला. प्रथम पाण्यात बुडालेल्या हर्षल चा तिसऱ्या दिवशी मृतदेह हाती लागला आहे.Bodies of drowned youths found in Wardha river.