हायवाच्या धडकेत आटोचालक ठार
Auto driver killed in collision with Hiva.वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परसोडा(पळसोनी) फाट्यावर हायवाने आटोला समोरून धडक दिली. यात ३५ वर्षीय आटो चालक ठार झाल्याची घटना रविवारी रात्रीचे १० वाजताचे सुमारास घडली आहे. तूर्तास त्याचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
पळसोनी फाट्यावर घडला अपघात
Auto driver killed in collision with Hiva.तालुक्यातील राजूर कॉलरी येथील राम खिलावन बसई प्रसाद (३५) हा वणीवरून आटो क्रमांक एम एच २९ व्ही ८१४४ ने जात असताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक एम एच ३४ ए बी ९५२३ ने आटोला जबर धडक दिली. यात आटो चालक राम खिलावन प्रसाद चा मृत्यू झाला आहे. तर आटोचा चुराडा झाला आहे. संबंधित घटनेची तक्रार आनंद खरबन प्रसाद याने पोलिसात दिली आहे. राम खिलावन चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.Auto driver killed in collision with Hiva.