वणी शहरात भरदिवसा घरफोडी.
वणीः- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या काळे लेआउट मधील घरातून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करीत अडीच लाख रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. Burglary in broad daylight in Wani city.
शहरातील काळे लेआउट भागात राहणारे रूपेश नंदकिशोर भटगरे, 30 हे शनिवारी दुपारी अडीच वाजताचे सुमारास घराला कुुलूप लावून कुलूपाची चावी खिडकीत ठेवून कामानिमित्य बाहेर गेले होते. रविवारी ते घरी परत आले. घरी येताच घराचा दरवाजा उघडाच असलेला दिसता. घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसले. कपाटही उघडेच होते. कपाटात ठेवलेली 35 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत दिसलीच नाही. त्यांनी कपाटात शोधाशोध केली.घरात सर्व ठिकाणी शोध घेतला परंतू दोन लाख 39 हजार सहाशे 70 रूपये किमतीची सोन्याची पोत चोरट्यानी लंपास केल्याचे दिसून आले. रूपेश यांनी पोलीस ठाणे गाठून या घटनेची रितसर तक्रार वणी पोलीस ठाण्यात नोंदविली त्या तक्रारीवरून पोलीसांनी भादंवि 380 व इतर कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. Burglary in broad daylight in Wani city.
घरफोडीचे सत्र सुुरूच!
मागील एक महिण्यांपासून शहरात चोरी घरफोडीचे सत्र सुरूच आहे. सहारा पार्क, साईमंदीर परिसरातील घरातून लाखो रूपये किमतीच्या सोन्याच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. आता काळे लेआउट मधिल घर सुध्दा चोरट्यांनी भरदिवसा फोडून लाखो रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. Burglary in broad daylight in Wani city.
पोलीसांना चोरट्यांचा थांगपत्ताच लागेना?
गेल्या एका महिण्यात तिन ठिकाणी घरफोड्या झाल्या आहे. दुचाकी चोरट्यांनी तर हौदोसच घातला आहे.साई मंदिर परिसरातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या घरी चोरट्यांचा प्रयत्न फसला खरा पण इतर घरफोड्या झाल्या त्याचे आरोपी पोलीसांना अद्याप गवसले नाही हे विशेष.भर दुपारी शहरात घरफोड्या होत आहे. मात्र पोलीसांना चोरटे गवसले नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.