रंगनाथस्वामी यात्रा निविदा प्रक्रियेत घालमेल Ranganathaswamy Yatra will be involved in the tender process

0

रंगनाथस्वामी यात्रा निविदा प्रक्रियेत घालमेल.

निविदा प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप Ranganathaswamy Yatra will be involved in the tender process.


वणी:-  येथे दरवर्षी भरणाऱ्या ३६ दिवसीय रंगनाथस्वामी यात्रा निविदेत घालमेल करून भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार कायर येथील माजी सरपंच अफजल बेग यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
Sangini News



रंगनाथस्वामी यात्रा प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे ३६ दिवसांची यात्रा भरते, यात मोठा बैलबाजार, मनोरंजक पार्क, व इतर साहित्याचे दुकाने लागतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी २० मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत यात्रा भरणार आहे. यासंबंधी नगर पालिका प्रशासन दरवर्षी नियमाप्रमाणे निविदा फलक,दवंडी,वृत्तपत्र आदी माध्यमातून प्रसिद्ध करते. मात्र यावेळी पालिका प्रशासनाने घालमेल करीत निविदा फलकावर लावल्या नाहीत,दवंडी दिली नाही. व वृत्तपत्रातून प्रसिद्धी सुद्धा केली नसल्याचा आरोप कायर येथील माजी उपसरपंच अफजल बेग यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.Ranganathaswamy Yatra will be involved in the tender process.

प्रशासनाची चालढकल


यात्रेत मनोरंजक पार्क लावण्यासाठी निविदा अर्ज भरण्यासाठी गेलेल्या अफजल बेग यांना निविदा भरण्याची मुदत संपल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परिणामी निविदा प्रकरणात चालढकल करीत येथील अधिकाऱ्यांनी विशिष्ट व्यक्तीसाठी खटाटोप केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


विशिष्ट व्यक्तीसाठी खटाटोप

रंगनाथस्वामी यात्रेची निविदा माध्यमातून प्रकाशित न करता नगर पालिका प्रशासनाने विशिष्ट व्यक्तीसाठी खटाटोप केला आहे. यात अधिकाऱ्यांचे हात चांगलेच बरबटलेले आहे. निविदा प्रक्रिया न करता भ्रष्टाचार करीत केवळ सदर व्यक्तीसाठी प्रशासनाने भ्रष्टाचार करीत खटाटोप केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.Ranganathaswamy Yatra will be involved in the tender process.


फेर निविदा प्रक्रिया राबवा

रंगनाथस्वामी यात्रा निविदा प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने यात्रा निविदा प्रक्रिया माध्यमातून प्रकाशित करून सर्वांना यात सहभाग नोंदविण्याची संधी देऊन या प्रकरणात दोषी असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अफजल बेग यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top