वणीत घरफोडीचे सत्र सुरूच Burglary season continues in Wani

0

वणीत घरफोडीचे सत्र सुरूच.Burglary season continues in Wani.


फाले लेआऊट मधील घटना


चोरट्यापुढे प्रशासन हतबल


वणी:- शहरातील फाले लेआऊट मधील घराचा दरवाजा तोडून चोरट्यानी घरातील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला आहे. प्रसंगी शेजारच्या युवका सोबत चोरांची झटापट झाल्याची घटना मंगळवार चे रात्री अडीच वाजताचे सुमारास घडली आहे. एकापाठोपाठ एक घरफोडीच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासन चोरट्यांपुढे जणू हतबलच झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.Burglary season continues in Wani.

Sangini news


वणी पोलिसांच्या हद्दीत घरफोडीचे सत्र सातत्याने सुरू आहे. सहारा पार्क,साई मंदिर, रविवारी काळे लेआऊट आणि त्याच परिसरातील फाले लेआऊट मधील घरांच्या दरवाज्याचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करून चोरटे पोबारा करीत असल्याच्या घटना दैनंदिन घडतांना दिसते आहे.Burglary season continues in Wani.
     रविवारीच काळे लेआऊट मध्ये घरफोडीची घटना घडली आहे. या घटनेची शाई वाळते न वाळते तो फाले लेआऊट मध्ये घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे.
   फाले लेआऊट मधील राजीव दादाजी झाडे हे मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बहिणीला सासरी सोडण्यासाठी परिवारासह चंद्रपूर ला निघून गेले होते. घरी झोपण्यासाठी त्यांनी लगतच असलेल्या जैन लेआऊट मधील मावस भाऊ रोमल दौलत बोबडे याला सांगितले होते. रोमल रात्री सव्वा दोन वाजताचे सुमारास राजीव झाडे यांच्या घरी झोपण्यासाठी दारावर येतात घरातून चोरटे बाहेर पडले. यात रोमल सोबत झटापट झाली. आणि चोरट्यानी लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


कपाटातील दागिने,रोख रक्कम लंपास

झाडे यांनी घरात असलेल्या कपाटात पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने यात चार तोळे वजनाची पोत, १५ ग्रॅम वजनाचा गोफ, दोन ग्रॅम वजनाचे रिंग, तीन ग्रॅम वजनाची अंगठी व ६५ हजार रुपये रोख रक्कम ठेवली होती. घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला व घरात असलेल्या संपूर्ण कपाटातील साहित्याची नासधूस करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.Burglary season continues in Wani.


रोमल सोबत झटापट. चोरटे सीसीटीव्हीत कैद

राजीव झाडे यांनी जैन लेआऊट मध्ये राहणाऱ्या रोमल बोबडे याला घरी झोपण्यासाठी सांगून ते बहिणीला सोडण्यासाठी परिवारासह चंद्रपूर ला निघून गेले होते. रोमल हा राजीव झाडे यांच्या घरी झोपण्यासाठी रात्री सव्वा दोन वाजताच्या पुढे झाडे यांच्या घराजवळ आला असता घरातील चोरटे पळून जाऊ लागले. यात त्यांची रोमल सोबत झटापट झाली. चोरट्यानी हातात असलेल्या पेचकस ने वॉर करण्याचे प्रयत्न करीत तेथून पोबारा केला. मात्र चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती आहे. सोबतच दोन चोरट्यानी तोंडावर रुमाल बांधला होता. ट्रॅक सूट घालून असल्याची माहिती आहे. आणि दोन्ही २५ ते ३० वयोगटातील असल्याचे नमूद आहे.Burglary season continues in Wani.


डीबी पथक ठरतेय नावापुरतेच.

वणी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध शाखेला(डीबी) अद्याप एकाही घरफोडीचा सुगावा अद्याप लागलेला नाही. गेल्या एका महिन्यात चार ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. मात्र चोरटे डीबी पथकाच्या रडारवर अद्याप आलेच नसल्याने या पथकाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या घरफोडीचे, चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. मग डीबी पथक करते तरी काय? असा सवाल उपस्थित होते आहे. एकूणच पोलिसांचा वचक राहिला नसल्याने एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असल्याचे बोलल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top